Marathi News> मनोरंजन
Advertisement

मितालीच्या बिकीनी लुकवरून वाद 'साऊथच्या अभिनेत्री संस्कृती जपतायत...' म्हणत नेटकऱ्यांनी झापलं

Mitali Mayekar Bikini Photos: अभिनेत्री मिताली मयेकर हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स आहेत. सध्या तिनं आपले बाली येथील काही बिकीनी फोटोज हे शेअर केले आहेत. ज्यामुळे पुन्हा वादाला पेव फुटलं आहे. 

मितालीच्या बिकीनी लुकवरून वाद 'साऊथच्या अभिनेत्री संस्कृती जपतायत...' म्हणत नेटकऱ्यांनी झापलं

Mitali Mayekar Bikini Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मिताली मयेकर हिची. मिताली मयेकर ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. इन्टाग्रामवरही तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली असते. मिताली आणि सिद्धार्थनं काही दिवसांपुर्वी आपल्या दुबईच्या ट्रीपचे फोटो हे शेअर केले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनीही तूफान लाईक केले होते. आता मितालीच्या एका फोटोची चर्चा आहे. बोल्ड आणि बिनधान्स मितालीनं बालीच्या समुद्रकिनारी आपले बिकीनीमधले फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी तिची जोरात चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी तिनं तिच्या अशाच एका परदेश दौऱ्याच्या निमित्तानं आपले बिचवरील बिकीनी फोटो हे शेअर केले होते. त्यावेळीही तिची जोरात चर्चा होती. तिनं हे फोटो शेअर करताना खाली कॅप्शनमध्ये लिहिले होते की बिकीनी फोटो घातल्यानं कृपया मला संस्कृतीचे ज्ञान देऊ नका... 

तिच्या या पोस्टवरून बरीच चर्चा रंगलेली होती. अनेकांनी तिच्या या बोल्डनेसचे कौतुकही केले होते. परंतु त्यातूनही बऱ्याच जणांनी तिच्यावर प्रचंड टीका केली होती. सध्या तिनं बाली येथे सर्फिंगचा आनंद लुटला. तेव्हा तिनं बीचवरील आपले बिकीनी फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी तिनं फोटोला कॅप्शन दिलंय. 'सनसेट सर्फिंग'. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलंय, 'वाटोळे करा मराठी संस्कृतीचे'. तर दुसऱ्यानं लिहिलंय की, 'काम मिळतं नाहीत म्हणून हे सगळे प्रयत्न'. त्यात अनेकांनी असं लिहिलंय की, दक्षिणेतील अभिनेत्री आपली परंपरा जपतात आणि तूम्ही आपल्या संस्कृतीची वाट लावता.

सध्या तिच्या या फोटोवरून बराच वाद निर्माण झाला आहे तर अनेकांनी तिच्या या फोटोवर सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सध्या सिद्धार्थ आणि मिताली दुबईमधील आपले फोटो हे पोस्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या फोटोंचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी जानेवारी 2021 मध्ये लग्न केले होते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगली होती. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्या दोघांच्या लग्नातील लुकचीही बरीच चर्चा होती. लग्नापुर्वी ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मितालीनं अनेक मराठी नाटकं, सिनेमा आणि सिरियल्समधून कामं केली आहेत. ओटीटीवरही दोघांनी कामं केली आहेत. सोबतच सिद्धार्थही 2009 पासून मराठी मनोरंजनविश्वात सक्रिय आहे. त्याची पहिली गाजलेली मालिका 'अग्निहोत्र' आजही लोकप्रिय आहे. 

Read More