Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ब्रा न घालता...', मिताली मयेकरची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली 'महिलांनो...'

मिताली मयेकरला भटकंतीची प्रचंड आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून ती स्पेन, थायलंड, बँकॉक, फ्रान्स अशा विविध ठिकाणी फिरताना दिसत आहे.

'ब्रा न घालता...', मिताली मयेकरची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली 'महिलांनो...'

Mitali Mayekar Instagram Story :  मराठी सिनेसृष्टीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मिताली मयेकरला ओळखले जाते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. त्याबरोबरच ती कायमच स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते. तसेच अनेकदा ती ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळते. नुकतंच मितालीने सर्व महिलांना एक अनोखा सल्ला दिला आहे. 

मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिला भटकंतीची प्रचंड आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून ती 
स्पेन, थायलंड, बँकॉक, फ्रान्स अशा विविध ठिकाणी फिरताना दिसते. आता मितालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर तिने महिलांना ब्रा न घालण्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर तिने महिलांना खास सल्लाही दिला आहे. 

"ब्रा न घालता एखादे ओव्हरसाईज कपडे घालणं म्हणजे स्वत:ची सर्वोत्तम काळजी घेण्यासारखंच", अशा आशयाची एक स्टोरी मितालीने पोस्ट केली आहे. यावर तिने "महिलांनो यावर बोला", असे म्हटले आहे. सध्या मितालीची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. 

fallbacks

दरम्यान मितालीने वयाच्या १३ व्या इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर मितालीने छोट्या पडद्यावरही काम केले. ती ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून झळकली. तसेच ‘उर्फी’ या चित्रपटातील भूमिकाही प्रचंड गाजली. 

२०१६ मधील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत तिने सायली बनकर नावाच्या मुलीचे पात्र साकारले होते. या मालिकेमुळेच ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. काही वर्षांपूर्वी मितालीने टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन केले. ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत ती ‘कस्तुरी साटम’ या भूमिकेत झळकली होती.

Read More