Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऋतुजा बागवे लवकरच अडकणार विवाहबंधनात, खुलासा करत म्हणाली 'लगेच...'

ऋतुजा बागवे ही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने नुकतंच याबद्दल एक भाष्य केले आहे. 

 ऋतुजा बागवे लवकरच अडकणार विवाहबंधनात, खुलासा करत म्हणाली 'लगेच...'

Rutuja Bagwe Marriage : गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरजंनसृष्टीला लग्नसराईचे वेध लागलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रथमेश परब लग्नबंधनात अडकला. तर दुसरीकडे अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या अनेक विधींना सुरुवात झाली आहे. त्यासोबतच अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांचा विवाहसोहळा शाही पद्धतीने पार पडला. तितीक्षाच्या विवाहसोहळ्याला जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी उपस्थितीत होते. आता तितीक्षाच्या लग्नानंतर अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ऋतुजा बागवेला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. ऋतुजा ही तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ऋतुजा बागवे ही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने नुकतंच याबद्दल एक भाष्य केले आहे. 

ऋतुजा बागवेची लग्नाबद्दलची कमेंट चर्चेत

ऋतुजाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची खास मैत्रीण तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. तिच्या या फोटोवर एका चाहतीने कमेंट केली आहे. त्यात तिने तिला लग्नाबद्दलचा प्रश्न विचारला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)

तिच्या या फोटोवर चाहतीने "तू पण कर ना ग लग्न", अशी कमेंट केली आहे. त्यावर ऋतुजाने प्रतिक्रिया देताना "मुलगा मिळाला की लगेच", असे म्हटले आहे. त्यावर त्या चाहतीने "तुझ्यासाठी तुझ्या एवढा perfect मुलगा कसा मिळेल आता ज्याच्यावर प्रेम होईल त्याच्याशी कर लग्न मला बघायचंय तुझ लग्न आणि तुझा special one", अशी कमेंट केली आहे. सध्या ऋतुजाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. 

fallbacks

ऋतुजा बागवेने 2008 मध्ये 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'स्वामिनी', 'मंगळसूत्र', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकेतही झळकली. या सर्व मालिकेत तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ऋतुजाला ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी ती ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात ती पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकली होती.

Read More