Sayali Sanjeev : बॉलिवूडमधील आणि मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी अभिनयासोबत राजकीय क्षेत्रात देखील ठसा उमटविला आहे. अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर अनेक कलाकारांनी राजकीय क्षेत्र निवडलं आहे. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने राजकारणात येणार असल्याचं भाष्य केलं आहे. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, सौंदर्य आणि अभिनयाने नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणारी मराठी अभिनेत्री सायली संजीव आता तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने राजकारणाची आवड असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काय म्हणाली सायली संजीव?
काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री सायली संजीवने सुमन म्युझिक मराठीच्या 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने मनसोक्त गप्पा मारल्या. या मुलाखतीत अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यामध्ये ती राजकारणात एन्ट्री करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायली संजीवने सांगितले की, तिला सक्रीय राजकारणात सहभागी होऊन चांगलं काम करायचं आहे.
जेव्हा ती राजकारणात येईल तेव्हा अनेक गोष्टी बदललेल्या असतील. त्यामुळे सध्या ज्या समस्या आहेत त्याकडे बघून तिने राजकारणात जाण्याचं ठरवलं. पण त्याचा आता काय फायदा होणार नाही. सायलीला लहानपणापासून वाटायचे की, रस्ते खराब आहेत, अनेक ठिकाणी घाण आहे. काही ठिकाणी वीज नाही तर काही ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई आहे. अनेक ठिकाणी तर रस्तासुद्धा नाही. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे आहेत. जर या सर्व गोष्टींची तक्रार करू पण हे सर्व करण्यापेक्षा तिला हे सर्व आपण करून बघू असं वाटतं होतं. कारण जर आपण हे केलं तर आपण दुसऱ्यांना नावं ठेवू शकतो.
त्यामुळे आपण पहिल्यांदा हे काम केलं पाहिजे. आपण एकदा तरी प्रयत्न करून बघायला पाहिजे. सर्व रस्ते सुंदर आणि खड्डेमुक्त करणे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे असणे. सर्वांना स्वच्छ हवा मिळावी आणि प्लॅस्टिकचा वापर कमी करावा. परंतु, हे सर्व करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. फक्त सरकारला आणि व्यवस्थेला नावं ठेवून जमत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात त्या क्षेत्रात उतराव लागतं. त्या ठिकाणी ही कामे करताना कोणत्या अडचणी येतात हे सर्व बघावं लागतं. त्यामुळे जोपर्यंत आपण काम करून ते बघत नाही, तोपर्यंत आपण कोणाला नावं ठेवू शकत नाही. असं तिने सांगितलं.