Marathi News> मनोरंजन
Advertisement

नव्या रुपात 'या' चित्रपटातून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाली कुलकर्णी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नव्या रुपात 'या' चित्रपटातून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून लांब असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटातून ती झळकणार आहे. नुकतंच, 'वेळेचे पाऊल आणि 'विक्की वेलिंगकर'ची चाहूल, फक्त काळालाच कळते!' अशा आशयाचं 'विक्की वेलिंगकर' चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.

fallbacks

 

सौरभ वर्मा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडिओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांनी केली आहे. यापूर्वी सौरभ वर्मा यांनी 'मिकी व्हायरस' आणि '7 अवर्स टू गो' या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.

'विक्की वेलिंगकर' येत्या ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

नटरंग, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी यांसारख्या चित्रपटांतून जबरदस्त भूमिका साकारणारी सोनाली आता 'विक्की वेलिंगकर'मधून काय कमाल करणार? हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

  

Read More