Marathi News> मनोरंजन
Advertisement

तेजश्री प्रधानचं झी मराठीवर पुनरागमन, नवीन मालिकेच्या प्रोमोसाठी रात्री 2 वाजता केलं शूट, सांगितला भन्नाट किस्सा

Tejashri Pradhan: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

तेजश्री प्रधानचं झी मराठीवर पुनरागमन, नवीन मालिकेच्या प्रोमोसाठी रात्री 2 वाजता केलं शूट, सांगितला भन्नाट किस्सा

Tejashri Pradhan: झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झी मराठीच्या नव्या मालिकेतून पुनरागमन करत आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत ती ‘स्वानंदी’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री आणि झी मराठी यांच्यातील खास नातं पुन्हा दृढ होत आहे.

प्रोमो शूट दरम्यान तेजश्रीने तिच्या नव्या भूमिकेबाबत आणि झी मराठीसोबत पुन्हा काम करण्याच्या अनुभवाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. “स्वानंदी ही एक परिपक्व व्यक्तिरेखा आहे. ती तिच्या आयुष्यातील समस्याही परिपक्वतेने हाताळते. मालिकेची संपूर्ण टीम खूपच छान आहे. सहकलाकारही जबरदस्त आहेत. त्यामुळे मालिकेचा प्रवास नक्कीच मजेशीर ठरणार आहे असं ती म्हणाली.

अभिनेत्रीने जाग्या केल्या जुन्या आठवणी

तेजश्रीने पुढे सांगितले की, 'या भूमिकेसाठी जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण कॉल करणारी माणसं आपल्या ओळखीची होती. टीम सुंदर आहे, विषय गोड आहे आणि काही जुन्या ओळखीच्या मंडळींसोबत पुन्हा एकत्र काम करण्याची संधी आता मिळाली आहे.

विशेष म्हणजे, 'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेतील कॅमेरा मागची काही टीम सदस्यदेखील या मालिकेचा भाग आहेत. त्यामुळे सेटवर जुन्या आठवणीही जाग्या झाल्या आहेत. झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांशी आपले असलेले नातं अधिक मजबूत होणार आहे. असा विश्वास अभिनेत्री तेजश्री प्रधानने व्यक्त केला आहे. 

रात्री 2 वाजता शूट केला सीन

प्रोमो संदर्भातील एक गंमतीशीर किस्सा सांगताना तेजश्री म्हणाली, स्वानंदीच्या ताटात गुलाबजामून असलेला एक शॉट रात्री 2 वाजता शूट केला. एकाच सीनसाठी वेगवेगळ्या अँगल्सनी शूटिंग चाललं होतं. त्या वेळेस गुलाबजामून खायचं टेंशन होतं. झोप उडाली होती. एकूण 7-8 गुलाबजामून मी खाल्ले. त्याच दिवशी संपूर्ण टीम पहिल्यांदा भेटली होती.

शेवटी तेजश्री म्हणाली की, प्रेक्षकांना एक चांगली मालिका देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रेमाचा विश्वास आहे आणि त्यांनी दिलेलं प्रेम आम्हाला नेहमीच ऊर्जा देतं. ‘वीण दोघातली ही तुटेना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तेजश्री प्रधानचा परिपक्व अभिनय आणि मालिकेचा गोड विषय प्रेक्षकांना नक्कीच या मालिकेत बघायला मिळणार आहे अशी अपेक्षा आहे.

Read More