अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायमच आपल्या अभिनयामुळे कायमच उजवी ठरते. अशातच सामाजिक बाबींवर तिचे मत ती अधिक स्पष्टपणे मांडते. तेजस्विनी पंडीतचा 'ये रे ये रे पैसा 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दरम्यान तेजस्विनी पंडितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तेजस्विनी पंडितने चहाची रेसिपी सांगितली आहे.
तेजस्विनी पंडितने सांगितलेल्या या चहाच्या रेसिपीमध्ये वेगळेपण आहे. अशा पद्धतीचा चहा बनवल्यास एक वेगळी चव चाखायला मिळेत यात शंका नाही.
पाणी
चहा पावडर
साखर
एका चहाच्या भांड्यात पाणी घ्यायचं. पाणी उकळायला ठेवल्यावर त्यामध्ये पुरेशा प्रमाणात साखर घालावी. साखर विरघळल्यावर गॅस बंद करावा. त्यामध्ये त्यामध्ये चहा पावडर घालून भांड झाकून ठेवतात. यामुळे चहा फार कडवट होत नाही. चहा पावडर फार पाण्यात न उकळल्यामुळे त्यामध्ये चव अतिशय हलकी राहते. यानंतर चहा पावडर चांगली मुरली की त्यामध्ये दूध घालतात. जी चहा पावडर वरती असते ती थोड्यावेळाने खाली पाण्यात विरघळते आणि चहा अप्रतिम होतो.
तेजस्विनीने सांगितलं की, अनेकजण दुधात चहा तयार करतात. पण आम्ही तसा न बनवता अशाच पद्धतीने पाण्यात चहा तयार करतो. ही माझ्या वडिलांनी सांगितलेली पद्धत आहे.
खासगी आयुष्य
तेजस्विनीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 2012 साली तिने लहानपणीचा मित्र भूषण बोपचे याच्यासोबत लग्न केलं होतं. भूष बोपचे हा उद्योगपती रामेश्वर बोपचे यांचा मुलगा आहे. लहानपणीच्या मित्राशीच लग्न तेजस्विनी केलं असलं तरीही हे नातम फार काळ टिकलं नाही. काही वर्षातच हे दोघं वेगळे झाले.
एका मुलाखतीत तिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तू लग्न कधी करणार, सेटल कधी होणार असे प्रश्न केले जात आहेत. तेव्हा तेजस्विनीने स्पष्टच आपलं मत मांड होतं. “मी सेटल आहे. मी आता माझ्या आयुष्यात पूर्णपणे सक्षमरित्या उभी आहे.”, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती. पुढे ती म्हणाली की,“मला कुणाशीही लग्न करणं किंवा आयुष्यात पुरुष असणं हे माझ्या सेटल होण्याचे कारण नाही किंवा उदाहरणं नाही.” “मी सेटल आहे, मी खुश आहे. मी मजेत आहे.” तसेच “मी काम करतेय आणि मी माझ्या परिवाराला सांभाळतेय.” ही प्रतिक्रिया दिली होती. तेजस्विनीने नुकताच आपला 39 वा वाढदिवस साजरा केला आहे.