Marathi News> मनोरंजन
Advertisement

उषा नाडकर्णी करणार बिग बॉस मराठीमध्ये धमाकेदार एन्ट्री

बिग बॉस हा शो तसा सगळ्यांच्याच आवडीचा. आता हा शो मराठीत येऊ घातला आहे. दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर या शोचे सुत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉसचे आतापर्यंतचे सर्व सिझन हीट ठरले आहेत. त्यामुळे आता मराठीतील बिग बॉस देखील पाहण्यासारखा असणार आहे. आणि यामध्ये उषा नाडकर्णी असणार तर ते नक्कीच लोकप्रिय ठरणार आहेत. 

उषा नाडकर्णी करणार बिग बॉस मराठीमध्ये धमाकेदार एन्ट्री

मुंबई : बिग बॉस हा शो तसा सगळ्यांच्याच आवडीचा. आता हा शो मराठीत येऊ घातला आहे. दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर या शोचे सुत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉसचे आतापर्यंतचे सर्व सिझन हीट ठरले आहेत. त्यामुळे आता मराठीतील बिग बॉस देखील पाहण्यासारखा असणार आहे. आणि यामध्ये उषा नाडकर्णी असणार तर ते नक्कीच लोकप्रिय ठरणार आहेत. 

उषा नाडकर्णी या कार्यक्रमाचा भाग असल्याचे त्यांनी स्वतः टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्या सांगतात, मी बिग बॉस मराठीत स्पर्धक म्हणून जाणार आहे. या कार्यक्रमात माझ्या वयाचे कोणतेही स्पर्धक नाहीयेत. खरे सांगू तर या कार्यक्रमात जायला मला थोडीशी भीती वाटत आहे. बिग बॉसमध्ये तुम्हाला तुमच्या फोनशिवाय राहायला लागते. त्यामुळे अनेकांना आपण फोनशिवाय राहू शकतो का याचे टेन्शन असते. पण मला फोनची तितकीशी सवय नसल्याने मला तसे टेन्शन नाहीये. 

‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात अभिनेता ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, गौरी सावंत या कलाकारांनी येण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही आता या घरात येणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटीच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. आता यापुढे आणखी कुणाची नाव समोर येतात हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहेत.  

Read More