Marathi News> मनोरंजन
Advertisement

सई ताम्हणकरचा सोशल मीडियाला 'ब्रेक'

सोशल मीडियाची सवय ऍडिक्शन झालं आहे.

सई ताम्हणकरचा सोशल मीडियाला 'ब्रेक'

मुंबई : मराठी आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी नेहमीच कनेक्ट असते. तिच्या जीवनात चालू असलेल्या अनेक गोष्टी ती सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सतत ऍक्टिव्ह असणाऱ्या सईच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सई सोशल मीडियामधून काही वेळासाठी ब्रेक घेणार आहे. सोशल मीडियाची ही सवय एक ऍडिक्शन झालं असल्याचं सांगत सई काही वेळासाठी यातून ब्रेक घेणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्याचं झालेलं ऍडिक्शन हा विचार सतावत असून त्यापासून मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगत सईने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'लवकरच भेटू' असं म्हणत तिने काही वेळ सोशल मीडियाच्या कोणत्याही माध्यमावर येणार नसल्याचं तिनं सांगितलं आहे.  

मला चाहत्यांशी संवाद साधायला खूप आवडतं. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा. मला स्वत:ला वेळ द्यायचा आहे. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचं तिनं सांगितलं आहे. आता सई सोशल मीडियावर कधी कमबॅक करणार आणि या कमबॅकमधून चाहत्यांसाठी ती काही सरप्राईझ आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More