मुंबई : महान मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रात मराठी दिवस साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजांनी त्यांच्या कारकिर्दीत १६ खंडांची कविता, तीन कादंबरी, लघुकथेचे आठ खंड, १८ नाटकं आणि ६ एकांकिका लिहिल्या. आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. २७ फेब्रुवारी या मराठी दिवसाला 'मायबोली मराठी ऊषा दिन', 'मराठी भाषा गौरव दिन', 'जागतिक मराठी राजभाषा दिन' इत्यादी नावांनी संबोधले जाते.
जनसामान्यांपासून कलाकार आणि राजकीयमंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या या पोस्टमधून मराठी भाषा जपण्याचा संदेश दिला आहे.
मराठी भाषा गौरव दिन'. यावर्षी हा गौरवदिन साजरा करतांना 'म्हणींना उत्सवमूर्ती बनविण्याचे ठरविले आहे. भाषेच्या या वैशिष्ट्यांचं महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावं हा यामागील उद्देश आहे.
— Vinod Tawde (@TawdeVinod) February 27, 2019
मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्व मराठीभाषा प्रेमींना हार्दिक शुभेच्छाpic.twitter.com/58f2IOHqiw
अभिनेता सिद्धार्थ जाधवने महान कवि कुसुमाग्रजांचा एक फोटो पोस्ट करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
— SIDDHARTH JADHAV FC (fanclubsidharth) February 27, 2019
जय महाराष्ट्र pic.twitter.com/zlsC9xbTrL
मराठी अभिनेत्री श्रृती मराठे हिने अनोख्या कॅप्शन सहित मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ज्यांना "भेटला" आणि "मिळाला" मधला नेमका फरक कळतो त्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!#मराठीभाषादिन
— Shruti Marathe (@scobidobi) February 27, 2019
वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छाpic.twitter.com/nPxmZlX9Uy