Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी तुला बुद्धिवंत...,' 'लब्बाड पटेल' म्हणणाऱ्या नाना पाटेकरांना जब्बार पटेल यांनी दिलं उत्तर, 'थापाड्या नाना...'

Jabbar Patel on Nana Patekar: मी जब्बार पटेलला 'लब्बाड पटेल'ला म्हणतो. त्याने मला सिंहासन चित्रपटात घेतलं आणि मानधनाचे दोन हजार दिलेच नाहीत असा आरोप नाना पाटेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता जब्बार पटेल यांनी उत्तर दिलं आहे.   

'मी तुला बुद्धिवंत...,' 'लब्बाड पटेल' म्हणणाऱ्या नाना पाटेकरांना जब्बार पटेल यांनी दिलं उत्तर, 'थापाड्या नाना...'

Jabbar Patel on Nana Patekar: मी जब्बार पटेलला 'लब्बाड पटेल'ला म्हणतो. त्याने मला सिंहासन चित्रपटात घेतलं आणि मानधनाचे दोन हजार दिलेच नाहीत असा आरोप नाना पाटेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता जब्बार पटेल यांनी उत्तर दिलं आहे. जब्बार पटेल यांनी नाना पाटेकरांना थापाड्या म्हटलं आहे. मी तेव्हाच पैसे दिले होते असा दावाही त्यांना केली. नाना उगाच सभा मारुन नेण्यासाठी काहीतरी बोलत असतो असा टोलाही त्यांनी लगावला. 

नाना पाटेकर यांनी एका चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या भाषणात त्यांनी दिग्गज अभिनेते अरुण सरनाईक, शरद राव, तसेच दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा विशेष उल्लेख केला. यादरम्यान त्यांनी जब्बार पटेलांना 'लब्बाड पटेल' म्हटलं.

नाना पाटेकर म्हणाले की, "मी त्याला लब्बाड पटेल म्हणतो. त्याने मला ‘सिंहासन’ या एकाच चित्रपटात घेतलं आणि मानधनातले दोन हजार रुपये दिलेच नाहीत. त्याने मग पुन्हा कधीच मला त्याच्या कोणत्याही चित्रपटात घेतलं नाही. कदाचित माझा अनुभव त्याच्यासाठी पुरेसा झाला असावा" 

नाना पाटेकर यांच्या आरोपावर उत्तर देताना जब्बार पटेल यांनी नानांना थापाड्या म्हटलं. "हा थापा मारतो. मी तेव्हाच पैसे दिले होते. आणि समजा बाकी राहिले असती तर ते मला तरी आठवत नाही. नाना उगीच आपली सभा मारून न्यायची म्हणून असे काही बोलत असतो", असं ते म्हणाले आहेत.

डॉ. जब्बार पटेलांनी नाना पाटेकरांना पुन्हा डिवचलं. नटाने सहनशील असावं लागतं आणि त्यासाठी आपलं मन ही मोठं असावं लागतं. आणि हो, नाना मी तुला पुन्हा काम दिलं नाही ही माहिकी चुकीची दिलीस. मी बुद्धीवंत प्राध्यापकाची भूमिका ऑफर केली होती...पण ती तू केली नाहीस,"

"शरद पवार हे आजवरचे सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंञी होऊन गेले आहेत, म्हणजे अजूनतरी आहेत. आणि अरूण सरनाईक हा आमचा पडद्यावरचा मुख्यमंञी होऊन गेलेला. सिंहासन हा सिनेमा बनवण्यात शरद पवारांचा खूप मोठा वाटा आहे. कारण पवारांनीच त्यावेळी आम्हाला शुटिंगसाठी खरंखुरं मंञालय उपलब्ध करून दिलं होतं. म्हणूनच हा सिहांसन हा अजरामर सिनेमा तयार होऊ शकला आहे. या सिनेमासाठी मंत्र्यांचे बंगलेदेखील शुटिंगला आम्हाला पवारांनीच उपलब्ध करून दिले तेदेखील मोफत. हे मुख्यमंत्री म्हणून फक्त पवारच करू शकतात," असं कौतुक त्यांनी केली.

"सिंहासनमधील मंत्रिमंडळ विस्तार हा सीन चक्क तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दालनात शूट झाला आहे," अशी आठवण सिंहासनचे निर्माता डॉ. जब्बार पटेल यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत जागवली. 

Read More