Marathi News> मनोरंजन
Advertisement

माझं नेटवर्क... ऋतुजा बागवेच्या फोटोवर ओंकार राऊतची बोल्ड कमेंट

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अशातच तिने पोस्ट केलेल्या फोटोवर ओंकार राऊतने केलेल्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कमेंट सेक्शनमध्येच ओंकार राऊत आणि ऋतुजा बागवे यांचा संवाद पाहायला मिळाला आहे

माझं नेटवर्क... ऋतुजा बागवेच्या फोटोवर ओंकार राऊतची बोल्ड कमेंट

Rutuja Bagwe : मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) सध्या जोरदार चर्चेत आहे. अनन्या या नाटकामुळे ऋतुजा बागवेने मराठी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबत मालिकांमधूनही ऋतुजा बागवेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ऋतुजा खास फोटोंसोबत नृत्याचे व्हिडीओदेखील पोस्ट करत असते. अशाच एका फोटोमुळे ऋतुजा बागवे सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शनिवारी एक फोटो अपलोड केला होता. या फोटोंमधल्या बोल्ड लूकने ऋतुजाने सर्वांचेच लक्ष्य वेधलं आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव देखील केला आहे. याच चाहत्यांमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रामधील मधील लोकप्रिय कलाकार ओंकार राऊत देखील आहे. मात्र ऋतुजाच्या फोटोवर ओंकार राऊतने (Omkar Raut) केलेल्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ऋतुजाने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या गळ्यातल्या नेकलेसने लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये ऋतुजाने हातात हिल्स घेऊन बोल्ड पोझ देखील दिली आहे. याच फोटवर ओंकार राऊतने कमेंट केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)

ओंकार राऊतने ऋतुजाच्या फोटोवर ‘हे सेक्सी यू’ असे म्हटले आहे. त्यावर ऋतुजाने हसत ‘धन्यवाद’ असे दोनदा कमेंट केली आहे. त्यावर ओंकारने ‘दोन वेळा धन्यवाद बोललीस, त्याबद्दल दोन वेळा तुझे आभार’, अशी उत्तर दिले आहे. यावर ऋतुजाने ‘मग हे धन्यवाद नेटवर्कला म्हणं’, असे म्हटले. याला उत्तर देताना ओंकारने 'तूच माझं नेटवर्क ग' असे म्हटले आहे.

fallbacks

दरम्यान, ऋतुजाचं ‘अनन्या’ हे नाटक जोरदार गाजलं होतं. या नाटकात ऋतुजाने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली होती. या नाटकातील ऋतुजाने केलेल्या कामाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. 

प्राजक्ता माळी लेडी क्रश?

दरम्यान, प्लॅनेट मराठीच्या एका कार्यक्रमात ऋतुजा बागवे आणि प्राजक्ता माळी यांचा एका किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. प्राजक्ता माझी लेडी क्रश होती असं ऋतुजा बागवेने म्हटलं होतं. त्यावर या कार्यक्रमात विचारल्यानंतर ऋतुजाने मोजक्या शब्दात भाष्य केले होते. आम्ही असं ऐकलं आहे की, प्राजक्ता माळी ही तुझी लेडी क्रश आहे आणि तू तिच्याबरोबर लेस्बियन पार्टनर व्हायला तयार झाली आहेस, असे विचारताच दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. यानंतर ऋतुजाने  'मी यावर्षी लग्न करणार आहे,' असे उत्तर दिले आणि दोघी हसू लागल्या.

Read More