Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आमच्या कोकणात...', मुग्धाला 'काकू' म्हणणाऱ्या महिलेला प्रथमेश लघाटेने सुनावले खडे बोल

 प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 21 डिसेंबर 2023 ला लग्नगाठ बांधली. त्यांनी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले होते. 

'आमच्या कोकणात...', मुग्धाला 'काकू' म्हणणाऱ्या महिलेला प्रथमेश लघाटेने सुनावले खडे बोल

Prathamesh Laghate answer to troller : मराठी संगीत विश्वातील लाडकी जोडी म्हणून प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांना ओळखले जाते. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा या दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. सध्या प्रथमेश आणि मुग्धा हे देवदर्शन करण्यात व्यस्त आहेत. आता मुग्धाने शेअर केलेल्या पोस्टवर एका युजर्सने काकू म्हणून कमेंट केली आहे. त्यावर मुग्धासह प्रथमेशने प्रतिक्रिया देत चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनचे देवदर्शन

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गोव्यातल्या केरी या ठिकाणी असलेल्या विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं दर्शन घेतले. याचे काही फोटोही त्यांनी पोस्ट केले होते. या पोस्टला कॅप्शन देताना तिने कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले! याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महराजांचं दर्शन घेतलं!, असे म्हटले आहे. यावेळी मुग्धाने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर प्रथमेशने हिरव्या रंगाच्या शॉर्ट कुर्ता घातला होता. 

प्रथमेश लघाटने दिले सडेतोड उत्तर

या पोस्टवर एका महिलेने कमेंट केली आहे. यात तिने काकु झाली आहे. टिपिकल बाई, असे म्हटले आहे. त्यावर मुग्धाने तिला प्रत्युत्तर दिले आहे. “स्तुती केल्याबद्दल धन्यवाद आजी.” अशी कमेंट मुग्धाने केली आहे. तर त्यावर त्या महिलेने मी काय तुझ्यासारखी नाही. मी मॉर्डन आहे. तू टिपिकल बाईसारखी आहे, असे म्हटले आहे. यानंतर प्रथमेशने कमेंट करत त्या महिलेला चांगलेच सुनावले आहे.  “आमच्या कोकणात एक म्हण आहे, ‘माकड म्हणतं आपली लाल..’ Just सांगितलं…बाकी मनात काही नाही आजी.” अशा चोख शब्दात प्रथमेशने त्या महिलेला उत्तर दिले आहे. 

fallbacks

 दरम्यान, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 21 डिसेंबर 2023 ला लग्नगाठ बांधली. या दोघांनी पारंपारिक पद्धतीने आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही सोशल मीडिया फारच सक्रीय असतात. त्या दोघांनीही “आमचं ठरलं!” असं लिहित त्यांचं नातं जगासमोर आणलं होतं.

Read More