Marathi News> मनोरंजन
Advertisement

अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का

अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. 

अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का

Rahul Vaidya Buys Luxury Apartment : मराठी कलाकारांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आलिशान घरांची खरेदी केली आहे. यामध्ये दोन मराठी गायकांची समावेश आहे. या गायकांनी दिवाळीच्या नंतर मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. सुप्रसिद्ध गायक राहुल वैद्यने नुकतेच मुंबईत 9 कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. स्क्वेअर यार्डच्या रिपोर्टनुसार, राहुल वैद्यने नवीन खरेदी केलेले अपार्टमेंट हे डीएलएच सिग्नेचरमध्ये आहे. हा प्रकल्प वांद्रे पश्चिम येथील डीएलएच ग्रुपचा प्रीमियम प्रकल्प आहे. हा प्रकल्प 1.25 एकमध्ये पसरलेला असून यामध्ये अनेक खास सुविधा देखील आहेत. 

रिपोर्टनुसार, मराठी गायक राहुल वैद्यने खरेदी केलेले अपार्टमेंट अंदाजे 3110 स्क्वेअर फूट 288.92 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे. राहुल वैद्यने या अलिशान अपार्टमेंटचा व्यवहारात 56.37 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. 

राहुल वैद्यने काही दिवसांपूर्वीच खरेदी केली कोट्यवधींची कार 

राहुल वैद्यने काही दिवसांपूर्वी  2 कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार खरेदी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्याचं अभिनंदन देखील केलं होतं. रेंज रोव्हर कारसह राहुल वैद्यकडे ऑडी आणि मर्सिडीज कार आहेत. अशातच आता राहुल वैद्यने मुंबईतील वांद्रे परिसरात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. 

अवधूत गुप्तेने खरेदी केलं खार पश्चिममध्ये आलिशान घर

काही दिवसांपासून बॉलिवूडमधील कलाकारांनी नवीन घरं खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबईत स्वत: चे घर खरेदी केले आहे. मराठमोळा गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते याने खार पश्चिम या ठिकाणी 7 कोटी 75 लाख रुपयांना आलिशान घर विकत घेतलं आहे. हे आलिशान घर अवधूत गुप्ते आणि त्याची पत्नी गिरिजा गुप्ते या दोघांनी मिळून खरेदी केलं आहे. 

अमृता खानविलकरने मुंबईत घेतलं नवीन घर

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. तिने सोशल मीडियावर या घराचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. या प्रवासात माझी गृहलक्ष्मी, माझी आई माझ्याबरोबर आहे, असं अमृता खानविलकर म्हणाली. 

Read More