Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बाला', 'उडता चमन'चा 'मरजावां' चित्रपटाला फटका

...म्हणून प्रदर्शनाच्या तारखेत तिसऱ्यांदा बदल

'बाला', 'उडता चमन'चा 'मरजावां' चित्रपटाला फटका

मुंबई : सध्या अभिनेता आयुषमान खुराना चांगलाच चर्चेत आहे. 'ड्रीमगर्ल' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर 'बाला' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलर रीलिज झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. परिणामी बाला चित्रपटाच्या निर्णयानंतर 'मरजावां' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. 

'बाला' एक अशा मुलाची कथा आहे ज्याचे केस बालपणीच गेले आहेत. बाला' आणि 'उडता चमन' चित्रपटाची कथा मिळती जुळती आहे. त्यामुळे 'बाला' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ८ नोव्हेंबर करण्यात आली आहे. 

या चित्रपटाच्या निर्णयाचा फरक थेट 'मरजावां'वर पडताना दिसत. २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा 'मरजावां' आता १५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे. 

Read More