Marathi News> मनोरंजन
Advertisement

नात- आजोबांची अनोखी जोडी एकत्र मालिकेत!

गौतमीसोबत दिसणार आजोबा

नात- आजोबांची अनोखी जोडी एकत्र मालिकेत!

मुंबई : आजवर मराठी मालिका विश्वात 'नातवंड आणि आजोबा' अशी जोडी एकत्र पडद्यावर दिसण्याचा योग कधीच आलेला नाहिये. पण 'माझा होशील ना' ह्या मालिकेतून तोही योग साधला गेला आहे. 'गौतमी देशपांडे' म्हणजेच सई आणि तिचे आजोबा ‘अरविंद काणे’ हे आपल्याला एकत्र मालिकेत दिसणार आहेत.

लहानश्या पात्राच्या माध्यमातून का होईना पण नातीला आणि आजोबांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. ह्याबद्दल बोलताना गौतमीचे आजोबा म्हणाले, १९५३ सालापासून नाट्यक्षेत्राशी संबंध आला. कॉलेज मध्ये असताना नाटकं केली, तसेच अनेक संस्थाबरोबर प्रयोग केले. हे सगळं करत असताना मी माझ्या बायकोबरोबर, मुलीबरोबर म्हणजेच गौतमीच्या आईबरोबर एकत्र काम केल, पण नाती बरोबर म्हणजेच गौतमी बरोबर काम करण्याचा योग्य येईल असं वाटलं नव्हतं, पण 'माझा होशील ना' या मालिकेमुळे 'नातं आणि आजोबाना' एकत्र काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद होतोय.

fallbacks

आणि ह्याबद्दल प्रचंड उत्साहात असलेली गौतमी म्हणाली लहानपणापासून आजोबांकडून नाटकातल्या गमती जमती ऐकायचे त्यांनी माझ्या आज्जी आणि आई बरोबर एकत्र काम केलय आमच्या घरातच लहानपणापासून acting होती. आजोबानी तो मी नव्हेच चे जवळपास ७५० प्रयोग केलेत, गेली अनेक वर्ष ते नाटक क्षेत्रात आहेत, आणि माझी खूप मनापासून इछा होती कि आजोबांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळावी, आणि लकीली ती 'माझा होशील ना' या मालिकेमुळे पूर्ण होतेय. माझ्यासाठी हि लाईफटाइम मेमरी असणार आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय.

तेव्हा पाहायला विसरू नका 'नातं आणि आजोबांचा' अनोखा योग 'माझा होशील ना' सोमवार ते रविवार रात्री ९.वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More