Marathi News> मनोरंजन
Advertisement

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये नव्या पात्राची एंट्री, नेहा-यशमध्ये येणार का दुरावा?

'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये नव्या पात्राची एंट्री, नेहा-यशमध्ये येणार का दुरावा?

मुंबई : झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची आणि जोडीला परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. (Mazi Tuzi Reshimgath New Entry in Serial on Zee Marathi ) या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं कि नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जाणवतंय. पण तिने अजून हि गोष्ट कबूल केली नाहीये.

आता मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे.जेसिका ही व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया निभावत आहे.

fallbacks

समीर जेसिका ही यशची एक्स गलफ्रेंड असल्याचं नेहाला सांगतो. जेसिकाच्या एन्ट्रीमुळे मालिकेत विलक्षण वळण येणार आहे. नेहाला या जेसिकामुळे होणारी जेलसी समीर हेरतो, हीच गोष्ट यशला देखील कळेल का?

यशसाठी असलेलं प्रेम जेसिकाच्या येण्यामुळे नेहा व्यक्त करू शकेल का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

 तेव्हा पाहायला विसरू नका माझी तुझी रेशीमगाठ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर

Read More