Marathi News> मनोरंजन
Advertisement

माझ्या नवऱ्याची बायको : जेव्हा गुरु राधिकाच्या हातापाया पडतो...

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको : जेव्हा गुरु राधिकाच्या हातापाया पडतो...

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शनायासोबत साखरपूडा केल्यानंतर गुरुची सुरु झालेली वाईट वेळ त्याला राधिकाचे पाय धरायला भाग पाडते. आपली डबगाईला आलेली कंपनी वाचवण्यासाठी गुरु अगदी राधिकाच्या हातापाया पडायला ही तयार होतो. चक्क तिची अपॉईंटमेंट घेऊन तिला ऑफिसमध्ये भेटायला येतो. 

आणि मग गंमतच होते. गुरुने केलेल्या अपमानचा पुरेपूर बदला घेण्याचे राधिका ठरवते. त्यात तिला साथ द्यायला तिची टीम कायम सज्जच असते. मग गुरु राधिकाच्या ऑफिसमध्ये येतो. पण तिथे त्याला ताटकळत बसावे लागते. आनंद, पानवलकर, जेनी आणि श्रेयस मिळून ताटकळत बसलेल्या गुरुची चांगलीच खिल्ली उडवतात. आणि मग काय होते, ते तुम्हीच पाहा...

 

 

 

Read More