Marathi News> मनोरंजन
Advertisement

शनायावरून 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत नवा ट्विस्ट

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी 

 शनायावरून 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत नवा ट्विस्ट

मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayko)  या मालिकेतील शनाया हे पात्र कायमच चर्चेत राहिलं आहे. शनाया (Shanaya) म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil)  हिच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे.. शनाया म्हणजे रसिका सुनीलने पुन्हा मालिकेत एन्ट्री करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.  पण आता या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे

येत्या काही दिवसात वगळलं जाणार आहे. सध्या शनाया रेडिओ जॉकी झालेली आहे असं दाखवण्यात आलंय. शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर.जे बिंदूराणीला कॉल करतो आणि त्यांची पुन्हा एकदा भेट होते. त्यानंतर शनाया त्याच्यासोबत परदेशी निघून जाते असं चित्र रंगवण्यात येणार आहे. त्यामुळे शनाया अर्थात रसिका सुनीलची मालिकेतून कायमचीच एक्झिट होणार आहे.

मालिकेत शनायाचा पूर्व प्रियकर आणि दुसऱ्या लग्नाबद्दल बोललं जातंय. त्यामुळे येत्या काही एपिसोडमध्ये तिचं लग्न लावून, ती दुसऱ्या देशात स्थायिक होईल असं दाखवणार असल्याचंही कळतंय. त्यामुळे शनाया ही व्यक्तिरेखाच मालिकेतून एक्झिट होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

काही महिन्यांपूर्वी रसिका सुनील ऐवजी इशा केसकर या मालिकेत शनायाची भूमिका साकारताना दिसली होती. रसिकाला खऱ्या आयुष्यात शिक्षणासाठी परदेशी जायचं असल्यामुळे तिच्या जागी इशा केसकरची वर्णी लागली होती. आता पुन्हा एकदा रसिका अमेरिकेला गेली आहे. २ जानेवारीत शनायाचा शेवटचा एपिसोड मालिकेत दाखवला जाणार आहे.  पण यानंतर मालिकेत शनाया कधीच दिसणार नाही. आता तिचं पात्रच या मालिकेतून वगळलं जाणार आहे. 

Read More