Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मेंटल है क्या' या चित्रपटात राजकुमार व्हिलनच्या भूमिकेत

राजकुमार राव वेगळ्या अंदाजात रूपेरी पडद्यावर...

'मेंटल है क्या' या चित्रपटात राजकुमार व्हिलनच्या भूमिकेत


मुंबई: 'मेंटल है क्या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव हा मुख्य भूमिकेत वेगळ्या अंदाजात रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याची ही भूमिका जरा हटके असणार आहे या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राजकुमार एका सीरियल किलरची भूमिका साकारणार आहे. राजकुमार पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकाणार आहे. राजकुमार रावने यापूर्वी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. 

'मेंटल है क्या' या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत पडद्यावर झळकणार आहे. 'मणिकर्णिका'च्या यशानंतर आता कंगना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. कंगना आणि राजकुमार एकमेकांना भेटतात त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे नाते कसे निर्माण होते, यावर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. 

यापूर्वी देखील कंगना आणि राजकुमारने 'क्वीन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे शुटिंग आटोपले असून सध्या तांत्रिक कामही अंतिम टप्प्यात आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल.  एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. 

Read More