Marathi News> मनोरंजन
Advertisement

#MeToo : सेक्रेड गेम्समधील अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर आरोप

मोठा खुलासा 

#MeToo : सेक्रेड गेम्समधील अभिनेत्रीचा  दिग्दर्शकावर आरोप

मुंबई : वेब सिरीज सेक्रेड गेम्सच्या अभिनेत्रीने दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. विपुल शाह कायम तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे. एवढंच काय तर त्यांनी तिला किस करण्याचा देखील केला प्रयत्न. 

'नमस्ते लंडन' या सिनेमासाठी एका कॅरेक्टरसाठी माझा विचार करण्यात येत होता. एल्नाज नौरोजीच्या मॅनेरने त्यांना सेकंड फीमेल लीड रोल मिळू शकतो असं सांगितलं. काही दिवसांनी बीचवर एल्नाजच ऑडिशन घेण्यात आलं. विपुल शाह यांनी पुन्हा एकदा तिला ऑफिसमध्ये बोलावं. त्यांच असं म्हणणं होतं की, एल्नाजचा अभिनय आवडला नाही आणि पुन्हा एकदा ऑडिशनकरता बोलावलं आहे.

पुढे एल्नाजने सांगितलं की, जेव्हा त्यांनी मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावलं तेव्हा मला किस करण्याचा प्रयत्न केला.  मी मागे झाले आणि त्यांना धक्का दिला. मला पुन्हा पटियालाला बोलावण्यात आलं. आणि पुन्हा एकदा ऑडिशन देण्यास सांगितलं. मला एका खोलीत बोलावलं स्क्रिप्ट ऐकण्यासाठी तेव्हा मला त्यांनी खूप चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. पुढचे 2 महिने तिने या सिनेमासाठी वाट पाहिली. त्यानंतर सेक्रेड गेम्सची आलेली ऑफर त्यांनी मला नको घेऊ असा सल्ला दिला. पण जेव्हा पण मी त्यांच्या ऑफिसमध्ये जायचे तेव्हा ते माझ्याशी चुकीचा व्यवहार करायचे. 

 

Read More