Marathi News> मनोरंजन
Advertisement

सर्वजण गाढ झोपेत असतानाच सनी लिओनीच्या घरी पोहोचला मिका सिंग आणि पुढे.... Video Viral

काही किस्से हे चाहत्यांनाही धक्का देतात.   

सर्वजण गाढ झोपेत असतानाच सनी लिओनीच्या घरी पोहोचला मिका सिंग आणि पुढे.... Video Viral

मुंबई : सेलिब्रिटी आणि त्यांच्या सोबत घडलेले किस्से अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. काही किस्से तर इतके विनोदी असतात की, ते आठवून सेलिब्रिटींनाही हसू आवरता येत नाही. तर काही किस्से हे चाहत्यांनाही धक्का देतात. 

असाच एक किस्सा घडला होता, गायक मिका सिंग आणि अभिनेत्री सनी लिओनी यांच्यासोबत. 

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)या कार्यक्रमात यासंदर्भातील उलगडा झाला. 

जिथं खुद्द मिका आणि सनीनं हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानी बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. मिकानंतर हेसुद्धा सांगितलं की तो सनीच्या घरी अवेळी पोहोचला होता. 

सर्वजण गाढ झोपेत असताना मिकाचं तिथे पोहोचणं त्यालाही काहीसं पेचात टाकणारं होतं.

मिका म्हणाला, 'मी सनीच्या अमेरिकेतील घरी गेलो होतो. तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. खरंतर मला उशीर झाला होता. 

तुम्ही खरंच चुकीचं समजू नका. मला वाटलेलं मी 11.30 वाजता तिथे पोहोचेन पण, फरफॉर्मन्समुळं मला उशीर झाला होता. 

बरं, हे किती गोड आहे पाहा.... सनीनं रात्री मला पिझ्झा बनवून दिला, कॉफीही दिली. आजही मला ते सर्व आठवतंय.'

सनीच्या घराती प्रशंसा करत मिकानं ती आपली आवडती अभिनेत्री असल्याचंही सांगितलं. सनी लिओनीसोबत काम करण्याचा अनुभवही त्यानं यावेळी शेअर केला. 

मिकाच्या लग्नाचे संकेत सनी देते तेव्हा... 
गप्पागोष्टींमध्ये सनीनं मिकाच्या लग्नाचे संकेतही दिले. पुढच्या वर्षापर्यंत त्याचं लग्न होईल, असं ती म्हणाली. आता सनी म्हणाल्याप्रमाणे खरंच मिका पुढच्या वर्षात लग्न करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Read More