Marathi News> मनोरंजन
Advertisement

मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचं थाटात लग्न

मिलिंद गुणाजी यांच्या मुलाची नवी सुरूवात...  

मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचं थाटात लग्न

मुंबई : मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपटांमधून खलनायक साकारणारा अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचं नुकताचं थाटात लग्न पार पाडलं. त्यांच्या मुलाचं नाव अभिषेक गुणाजी आहे. तर त्यांच्या सूनेचं नाव राधा पाटील आहे. अभिषेक गुणाजीने गर्लफ्रेंड राधा पाटीलसोबत लग्न केलं. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

fallbacks

अभिषेक आणि राधा लग्न मालवण येथे नयनरम्य वातावरणात एका मंदिरात झाले. 17 डिसेंबर 2021 रोजी  राधा आणि अभिषेकने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. 

fallbacks

अभिषेक आय.टी. इंजिनीयर आहे. पण कालांतराने अभिषेकने  कला आणि दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. तर राधा मुंबईत असून ती फार्मा उद्योगात काम करते. अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांचा 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. 

fallbacks

एवढंच नाही तर तो  व्यावसायिक जाहिरातींसाठी देखील काम करत आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले.

Read More