Marathi News> मनोरंजन
Advertisement

आर्यनमॅनवर का आली सिटीस्कॅनची वेळ?

अभिनेता त्याच्या चाहत्यांशी नेहमी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

आर्यनमॅनवर का आली सिटीस्कॅनची वेळ?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण हा बॉलिवूडचे सर्वात फिट अभिनेते मानला जातो. त्याच्या फिटनेसची चर्चा फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. वयाच्या 55 व्या वर्षीही तो फिटनेस आणि स्टाईलने आजच्या अभिनेत्यांना मागे टाकतो. त्याच बरोबर, अभिनेता त्याच्या चाहत्यांशी नेहमी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

मिलिंद सीटी स्कॅन करताना दिसला
मिलिंद अनेकदा त्याच्या वर्कआउटचे व्हिडिओ चाहत्यांसोबत पोस्ट करतो. मात्र, यावेळी अभिनेत्याने स्वतःचा असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर त्याचे चाहते त्याच्याबद्दल थोडे काळजीत पडले आहेत. या फोटोमध्ये मिलिंद सीटी स्कॅन मशीनवर बसलेला दिसत आहे. पहिल्यांदाच, अभिनेत्याचे चाहते अशा प्रकारे आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्याच्याबद्दल चिंता देखील करत आहेत.

मिलिंद रूटीन चेकअपसाठी गेला होता
अभिनेता केवळ रूटीन चेकअपसाठी गेला होता. तो पूर्णपणे ठीक आहे. हे फोटो पोस्ट करत मिलिंदने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बैंगलोरमध्ये सीटी स्कॅन करण्यात आली आहे, ज्यामध्ये सर्वकाही ब्लॉकेज इत्यादी तपासले गेले आहेत. सगळं काही सामान्य आहे. नियमित तपासणी आवश्यक आहे मात्र आपण तपासणी दरम्यान जे आहोत ते नक्कीच अधिक आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्याने केलं  420 किमी रनिंग
अलीकडेच मिलिंद सोमणने मुंबईतील शिवाजी पार्क ते गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत 420 किमीची रनिंग पूर्ण केलं होतं. त्याला 8 दिवस लागले. या प्रवासाचा एक व्हिडिओ मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर देखील पोस्ट केला होता.

Read More