Marathi News> मनोरंजन
Advertisement

Mira Kapoor चा रात्री असा ड्रेस? पत्नीवर शाहिद सतत ठेवतोय लक्ष

मीरा आणि शाहिदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, शाहिदचा वाढलाय त्रास...  

Mira Kapoor चा रात्री असा ड्रेस? पत्नीवर शाहिद सतत ठेवतोय लक्ष

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी, मीरा राजपूत (Mira Rajput)ही जोडी कायमच त्यांच्या केमिस्ट्रीसाठी चर्चेत असते. सिनेमा वर्तुळाशी थेट संबंध नसतानाही शाहिदच्या आयुष्यात आलेल्या मीरानं त्याच्या विश्वात एक कायमस्वरूपी आणि भक्कम असं स्थान तयार केलं. शाहिद आणि मीरा कोणत्याही ठिकाणी दिसले, की फोटोग्राफर्स दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज असतात. आता पुन्हा दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये शाहिद पत्नी मीराची सर्वांसमोर काळजी घेताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मीराने नारंगी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. मीराचा ड्रेस शॉर्ट असल्यामुळे शाहिद सतत पत्नीची काळजी घेताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ शाहिद आणि मीराच्या डिनर डेट दरम्यानचा आहे. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर दोघांना स्पॉट करण्यात आलं. तेव्हा दोघांनी फोटोग्राफर्सना पोज दिल्या आणि त्यानंतर शाहिदने पत्नीला कारमध्ये बसवलं. 

सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मीरा राजपूत सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मीरा राजपूत तिच्या स्टाइल आणि फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. ग्लॅमरस - पारंपरिक आउटफिट असो किंवा ज्वेलरी, फुटवेअर अथवा स्टायलिश बॅग; सर्व गोष्टींची निवड मीरा स्वतःच करते. 

Read More