Marathi News> मनोरंजन
Advertisement

मिथुन चक्रवर्ती म्हणतोय, 'मी आहे नाग, हक्क माराल तर डंक मारेल'

वाढदिवसादिवशीच मिथुन यांची पोलीस चौकशी 

मिथुन चक्रवर्ती म्हणतोय, 'मी आहे नाग, हक्क माराल तर डंक मारेल'

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेता आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना आज त्यांच्या वाढदिवसादिवशी पोलीस चौकशीला सामोर जावं लागणार आहे. सकाळी 10 च्या सुमारास ही चौकशी झाली. मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपच्या निवडणुक रॅलीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ही चौकशी केली जात आहे. 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकी अगोदर मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चक्रवर्ती यांनी कोलकाताच्या ब्रिगेट ग्राऊंडवर भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंचावरून संवाद साधताना काही डायलॉग बोलले होते. त्यांनी म्हटलं होतं की,'मी कोबरा आहे. कुणी हक्क मारत असेल तर मी उभा राहीन.'

मिथुन चक्रवर्ती यांनी आपला लोकप्रिय डायलॉग 'मरूंगा यहा लाश गिरेगी शमशान में' असं देखील वक्तव्य केलं होतं. हा डायलॉग जुना झाला आहे. पुढे ते म्हणाले की,'मैं पानी का सांप नहीं हूं, मैं कोबरा हूं. दंश मारने से काम तमाम हो जाएगा'

Read More