Marathi News> मनोरंजन
Advertisement

फक्त बोल्डनेसमुळे Miya Biwi Aur Murder सीरिजचा ट्रेलर चर्चेत

आश्रम सीरिजनंतर 'मिया बिवी और मर्डर' सीरिजमधील बोल्डसीनमुळे सर्वत्र धुमाकूळ, पाहा ट्रेलर    

फक्त बोल्डनेसमुळे Miya Biwi Aur Murder सीरिजचा ट्रेलर चर्चेत

मुंबई : एम एक्स प्लेयरवर (MX Player) आश्रम सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर आता  'मिया, बिवी और मर्डर' (Miya Biwi Aur Murder) सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.  वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये प्रेम, सेक्स, फसवणूक आणि खून रहस्य असे सर्व काही पाहायला मिळणार आहे. सीरिजमध्ये बोल्ड कंटेट असल्यामुळे ट्रेलर तुफान चर्चेत आहे. 

सीरिजमध्ये जयेश (राजीव खंडेलवाल) आणि प्रिया (मंजरी फडणीस) यांच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत, पण दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी नसल्याचं कळत आहे.

सुनील मनचंदा दिग्दर्शित, सीरिजमध्ये रुशद राणा, अस्मिता बक्षी आणि प्रसाद खांडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सीरिज 1 जुलै 2022 पासून MX Player वर प्रदर्शित होणार आहे.

सीरिजमध्ये जयेश आणि प्रिया यांचं विवाहबाह्य संबंध सुरू होतात आणि इथून कथेत एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर सीरिजची चर्चा आहे. प्रेक्षक आता सीरिजच्या प्रतीक्षेत आहे. 

Read More