Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईशान किशन जयपूरच्या या सौंदर्यवतीला करतोय डेट, कोण आहे ती?

ईशान किशनच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती, तिच्या सौंदर्य पाहून क्रिकेटर 'क्लिनबोल्ड'  

ईशान किशन जयपूरच्या या सौंदर्यवतीला करतोय डेट, कोण आहे ती?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज ईशान किशनने फार कमी कालावधीत क्रिकेट विश्वात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ईशान किशन इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 सर्वात महागडा खेळाडू म्हणून ओळखला जातो. ईशान फक्त त्याच्या कामगिरीमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. 

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो. ईशानच्या आयुष्यात देखील एक खास व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे, अदिति हुंडिया (Aditi Hundia)....

ईशान बिहारचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड जयपूरची आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण अद्याप दोघांना सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केलेला नाही. सोशल मीडियावर दोघे एकमेकांच्या पोस्टवर कमेंट देखील करत असतात. 

fallbacks

अदितीबद्दल सांगयचं झालं तरी ती एक मॉडेल आहे. 2017 च्या फेमिना मिस इंडियाची ती फायनलिस्ट होती. त्याचबरोबर 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया जिंकली आहे.

अदिती (अदिती हुंडिया फोटो) 2016 मध्ये मिस राजस्थान स्पर्धेत फर्स्ट रनर अप ठरली. त्यानंतर 2018 मध्ये तिने मिस दिवा पेजेंटचा किताब जिंकला. पोलंडमधील मिस सुपरनॅशनल स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

fallbacks

अदिती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम इन्स्टग्रामवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

Read More