Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hotness मुळं मॉडेलसोबत सुपरमार्केटमध्ये असं काही घडलं, की पुन्हा जाताना दोनदा विचार करेल

अपमानानंतर ती म्हणाली... 

Hotness मुळं मॉडेलसोबत सुपरमार्केटमध्ये असं काही घडलं, की पुन्हा जाताना दोनदा विचार करेल

मुंबई : सोशल मीडियावर हल्ली काही असे चेहरे प्रसिद्धीझोतात येतात, ज्यांच्या वाट्याला आलेली लोकप्रियता पाहताना तुम्हीही थक्क व्हाल. बोल्डनेस, मादक सौंदर्य या बळावर बऱ्याच सौंदर्यवती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पण, सौंदर्य प्रत्येक वेळी प्रसिद्धीच देतं असं नाही. एका मॉडेलला चारचौघांतच याची प्रचिती आली आहे. (model iara ferreira kicked out of supermarket )

ब्राझिलीयन मॉडेल आणि इनफ्लुएंसर इयारा फेरियार (Iara Ferreira) हिनं सध्या अशा परिस्थितीचा सामना केला, जे पाहून तिलाही आपल्यासोबत नेमकं काय घडलं यावर विश्वास बसेना. 

प्रमाणाहून जास्त बोल्ड दिसत असल्यामुळं या मॉडेलला सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्यांनी थेट बाहेरची वाट दाखवली. आजवर आपल्याला अशा पद्धतीनं कुणीही हीन वागणूक दिली नव्हती, अशी प्रतिक्रिया झाल्या घटनेनंतर या मॉडेलनं दिली. 

इयारानं सांगितल्यानुसार ती मयामीतील एका सुपरमार्केटमध्ये गेली. पण, तिथं तिला खरेदी करण्यापासून रोखलं गेलं. दुकानातून बाहेर निघण्यास सांगण्यात आलं. बोल्ड आणि रिविलिंग कपडे घातल्य़ामुळं कर्मचाऱ्यांनी तिला बाहरेचा रस्ता दाखवला. 

मॉडेलिंगसोबतच अडल्ट फिल्म्समध्येही काम करणाऱ्या इयारानं आपल्यासोबत घडलेला हा प्रकार मन सुन्न करणारा असल्याचं सांगत खंत व्यक्त केली. आपण आक्षेपार्ह कपडे घातले नव्हते, हाच सूर ती आळवताना दिसली. 

Read More