Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रसिद्ध मॉडेलची रस्त्यावर लघुशंका, प्रवासात घडलेला प्रकार कॅमेरात कैद

मला गाडीत लांब प्रवास करण्याची सवय नाही, 

 प्रसिद्ध मॉडेलची रस्त्यावर लघुशंका, प्रवासात घडलेला प्रकार कॅमेरात कैद

मुंबई : फिटनेस आयडॉल मिलिंद सोमणचे फोटो त्यांच्या मनोरंजक बारकाव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. कधी फिटनेसचा नवा प्रकार तर कधी त्याची देशी शैली, यामुळे त्याचे नेहमीच चाहत्यांकडून कौतुक केले जाते.

त्याची लेटेस्ट इन्स्टा पोस्ट देखील खूप खास आहे. मिलिंदने जैसलमेर ते दिल्ली अशी रोड ट्रिप केली, यादरम्यानचे काही खास क्षण त्याने कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

मिलिंद सोमण यांनी त्यांच्या प्रवासातील दोन खास गोष्टी शेअर केल्या आहेत आणि त्या फोटोंच्या माध्यमातून दाखवल्या आहेत. एका फोटोत त्याने चहा पितानाचा फोटो शेअर केला आहे आणि दुसऱ्या फोटोत रस्त्याच्या कडेला असलेल्या ओपन टॉयलेटचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मिलिंद लिहितो- '800 किमी जैसलमेर ते दिल्ली रोड ट्रिप!!!

fallbacks

मला गाडीत लांब प्रवास करण्याची सवय नाही, त्यामुळे हायवेवरचे निसर्गसौंदर्य पहात असताना मला दोन महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या, चहा आणि टॉयलेट...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोत चहा तर ठीक आहे, पण मिलिंदने टॉयलेटसाठी शेअर केलेला फोटो मजेदार आहे आणि एक संदेशही देतो. मिलिंदने आपल्या पोस्टमध्ये  #swachbarat #sundarbharat असे लिहिले. मिलिंदच्या या दुसऱ्या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read More