Marathi News> मनोरंजन
Advertisement

3 चित्रपटामधून 500 कोटींची कमाई, आता GST भरण्यात बनला नंबर-1, कोण आहे हा अभिनेता?

मल्याळम इंडस्ट्रीमधील या अभिनेत्याने भरला 2024-2025 मध्ये सर्वात जास्त GST. ज्याने 3 चित्रपटांमधून केली होती 500 कोटींची कमाई.   

3 चित्रपटामधून 500 कोटींची कमाई, आता GST भरण्यात बनला नंबर-1, कोण आहे हा अभिनेता?

Malayalam actor : सुपरस्टार मोहनलाल हे 2024-2025 मध्ये मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त GST भरणारे अभिनेते ठरले आहेत. जीएसटी डिपार्टमेंट तिरुवनंतपुरम येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये त्यांनी सुपरस्टार मोहनलाल यांना देखील बोलावले होते. राज्याचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी मोहनलाल यांना हा पुरस्कार दिला. मोहनलाल यांच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर मोहनलाल यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

दरम्यान, मोहनलाल यांचा 2025 मध्ये पहिला चित्रपट 'L2: एम्पुरान' प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच 270 कोटी रुपयांची कमाई केली.  मोहनलाल यांच्या या चित्रपटाचे बजेट हे 175 कोटी रुपये इतके होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा जास्त कमाई केली. यासोबतच जर या चित्रपटाचे हक्क ओटीटीला दिले तर यामध्ये अनेक मोठी कमाई होऊ शकते. 

कमी बजेट असणाऱ्या चित्रपटाने केली प्रचंड कमाई

मोहनलाल यांचा दुसरा चित्रपट 'थुडारम' हा देखील 2025 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देखील प्रेक्षकांना प्रचंड आकर्षित केले. हा चित्रपट 28 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच जगभरात 235.30 कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई पाहता तुम्ही अंदाज लावू शकता की, इतक्या कमी बजेटमध्ये या चित्रपटाने इतकी कमाई करून निर्मात्यांना मालामाल केले होते. 

तर हे दोन्ही चित्रपट वगळता सध्या मोहनलाल यांचा 'कनप्पा' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये सुरु आहे. या चित्रपटात विष्षु मांचू, प्रभास, अक्षय कुमार यांच्यासह इतर कलाकार देखील आहेत. हा चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांमध्ये 27.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या जरी सुरुवात असली तरी हा चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये प्रचंड कमाई करेल असा अंदाज आहे. 

दरम्यान, सुपरस्टार मोहनलाल हे लवकरच आगामी चित्रपट 'दृश्यम-3' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांचा हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्वात जास्त जीएसटी भरणाऱ्यांमध्ये त्यांचा पहिला नंबर आहे. सध्या चाहते त्यांचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. मोहनलाल यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. 

Read More