Marathi News> मनोरंजन
Advertisement

गरोदरपणातील 'त्या' समजुतींबाबत करीना म्हणते...

काही गोष्टींची ती विशेष काळजी घेताना दिसत आहे

गरोदरपणातील 'त्या' समजुतींबाबत करीना म्हणते...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही सध्या तिच्या गरोदरपणावर लक्ष केंद्रीत करत आहे. कामावरही लक्ष देत या दरम्यानच्या काळात ती दुहेरी जबाबदारी अगदी लिलया पेलताना दिसत आहे. अशी ही अभिनेत्री स्वत:च्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेत आहे. यामध्ये ओघाओघानं फिटनेसलाही ती प्राधान्य देत आहे. 

गरोदरपणाच्या काळात अनेकजणांचे सल्ले मिळतात. हे करा, हे करुच नका, असंच करा किंवा असं केल्यानं असं होतं हो.... असे सर्व सल्ले ऐकून आपल्याला योग्य वाटेल ते करण्यावरच बी- टाऊनच्या या 'बेबो'चा भर दिसत आहे. 

'मिड डे'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबतच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या. करीनाचं हे दुसरं गरोदरपण आहे, त्यामुळं काही गोष्टींची ती विशेष काळजी घेताना दिसत आहे. याचबाबत सांगताना ती म्हणाली, 'अशी समजूत असते की गरोदरपणात होणाऱ्या आईनं दोन जीवांचं खाणं खावं. पण मी मात्र धान्य आणि भाज्यांच्या माध्यमातून योग्य प्रमाणात पोषक तत्त्वं खाण्यालाच प्राधान्य देत आहे.' एका अर्थी या समजुतीला करीनाने शहच दिला आहे. 

फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या करिनानं यावेळी तिच्या मैत्रीणींचे म्हणजेच मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे आभारही मानले. आपल्याला सुदृढतेकडे लक्ष देण्यासाठी या प्रेरित करत असल्याचं तिनं सांगिलतं. आपण एकत्र व्यायाम करत असून, ही बाब फार मजेशीर आहे असंही ती म्हणाली. 

 

जेवणाच्या सवयींबाबत सांगावं तर आपण साध्या खाद्यपदार्थांनाच प्राधान्य देत असल्याचं तिनं सांगितलं. बरं, इतकंच नव्हे तर केव्हातरी पास्ता आणि कॅरेमल कस्टर्डवरही ताव मारायाल आपल्याला आवडतो असंही तिनं न विसरता सांगितलं. खाण्यापिण्याच्या सवयी जपत असताना जीभेचे चोचले पुरवायलाही ही बी- टाऊन अभिनेत्री विसरत नाही हेच खरं. 

 

Read More