Marathi News> मनोरंजन
Advertisement

अबब.. सलमानचा अंगरक्षक शेराला मिळतो इतका पगार

अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेराने शुक्रवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

अबब.. सलमानचा अंगरक्षक शेराला मिळतो इतका पगार

मुंबई : अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेराने शुक्रवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यासमयी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. गेल्या २२ वर्षांपासून शेरा, सलमानच्या अंगरक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. तर या कामासाठी तो महिन्याला तब्बल १५ लाख रूपये स्वीकारत असल्याचे समोर येत आहे. परंतु यासंबंधतीत सलमानच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

आता शेरा, सलमानचा विश्वासू अंगरक्षक आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तनुसार, शेरा शिख असूनही नोकरीसाठी त्याने त्याच्या पगडीचा त्याग केला. 'जेव्हा तुम्ही कोणाची सुरक्षा करत असता तेव्हा पगडी सांभाळणं फार कठीण असतं.' असं तो म्हणाला.

करियरच्या सुरवातीला तो फक्त हॉलिवूड सेलेब्रिटींचे संरक्षण करायचा. वर्ष १९९७ पासून तो सलमान खानचे संरक्षण करत आहे.  शेरा सलमानला 'मालिक' म्हणून हाक मारतो. त्याचप्रमाणे शेराची स्वत:ची सेक्योरिटी कपंनी देखील आहे. 

Read More