Marathi News> मनोरंजन
Advertisement

‘ही’ आहे जगातील सर्वात सुंदर महिला; वयाच्या 62 व्या वर्षी तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील अभिनेत्री पडतात फिक्या

World Most Beautiful Women 2025 : जगातील सर्वात सुंदर महिलेच्या वयाबद्दल विचारलं तर त्या 30-35 या वयोगटातील असेल असं आपल्या डोळ्यासमोर येईल. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब वयाच्या 62 वर्षी एका महिलेला मिळाला आहे.   

‘ही’ आहे जगातील सर्वात सुंदर महिला; वयाच्या 62 व्या वर्षी तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील अभिनेत्री पडतात फिक्या

Most Beautiful Women 2025 : जगातील सर्वात सुंदर महिला कशी कोण असेल, कशी असेल, तिचं वय काय असेल असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. साधारण सर्वसामान लोकांना विचारलं की जगातील सुंदर महिला कोण असेल, तर तुम्ही म्हणाल 30 -35 वयोगटातील महिला ही जगातील सर्वात सुंदर महिला असणार आहे. तुमच्या डोळ्यासमोर एक तरुण व्यक्ती ही सुंदर असते असा एक समज आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल 2025 मध्ये जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब हा 62 वर्षांचा महिलेला मिळाला आहे.  

जगातील सर्वात सुंदर महिला कोण?

वाढत्या वयानुसार, सौंदर्यही कमी कमी होत जाते. योग्य आहार आणि फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी करुन तुम्ही वयाला आळा घालता. बॉलिवूडमध्ये रेखा, मलायका अरोरा असो किंवा संगीता बिजलानी अगदी माधुरी दीक्षित असो, या अभिनेत्रींचं सौंदर्य पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. नुकताच पीपल मॅगझिनच्या नवीनतम आवृत्तीत 2025 नुसार जगातील सर्वात सुंदर महिला कोण याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कोण जिंकल त्या महिलेचे वय जाणून आश्चर्यचकित व्हाल. हॉलिवूड अभिनेत्री डेमी मूरने जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून किताब पटकावला आहे. डेमीने वयाच्या 62 व्या वर्षी हा किताब जिंकून सर्वांना धक्का दिला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Demi Moore (@demimoore)

डेमी मूरबद्दल बोलायचं झालं तर, संपूर्ण जग तिच्या स्टाईलचे वेड असून तिच्या सौंदर्यासमोर, बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खान देखील फिके पडतील. डेमी मूर तिच्या स्टायलिश लूकने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by People Magazine (@people)

या वयातही डेमी मूर तिच्या स्टायलिश लूकने सर्वांना आश्चर्यचकित करते. जर तुम्ही या अभिनेत्रीचे इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिले तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. डेमी मूरने इथे एकापेक्षा जास्त फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमधून डेमी मूरच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकणार नाही. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, डेमी मूरने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या यादीमध्ये 'द सेव्हन्थ साइन', 'द सबस्टन्स', 'प्लीज बेबी प्लीज', 'सॉन्गबर्ड' आणि 'ब्लाइंड' सारख्या चित्रपटांची समावेश आहे. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चॉइसेस' चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. 

Read More