Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीला मौनी रॉयचा आधार, पार्टीतील फोटो व्हायरल

मौनीने शेअर केलेला पार्टीतील फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे.

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीला मौनी रॉयचा आधार, पार्टीतील फोटो व्हायरल

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi)  सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिराने पती राज कौशल यांना गमावलं आहे.  हृद्यविकाराच्या झटक्याने राज कौशल यांचं 30 जून रोजी निधन झालं. यावेळी तिच्या मित्रपरिवारने मंदिराला साथ देण्याचा पुर्ण प्रयत्न केला. मंदिराची हिंमत वाढवण्यासाठी जमेल ते प्रयत्न केले. नुकताच अभिनेत्री मौनी रॉयने मंदिरासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

मौनीने शेअर केलेला पार्टीतील फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. मौनीने मंदिराला मिठी मारत शेअर केलेल्या या फोटोत दोघांची घट्ट मैत्री दिसून येत आहे.या फोटोमध्ये मंदिराने ब्लॅक कलरचा स्लिव्हलेस टॉप आणि लेदर पॅन्ट घातली आहे, तर मौनीने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. 

मौनीने या फोटोला " MY BABY STRONGEST " असं कॅप्शन दिलं आहे. मौनी आणि मंदिरा यांची चांगली मैत्री आहे. दोघीही बॉलिवू़ड इंडस्ट्रीतील टॉपच्या  अभिनेत्री आहेत. मौनीच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी हॉर्ट शेपचे इमोजी शेअर करत पसंती दर्शवली आहे. 

मंदिरा बेदीने पतीसोबतच्या काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्ट ब्रेक इमोजी शेअर केला आहे.पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी तिच्या कपडयांवरुन चांगलीच ट्रोल झाली होती. पती राज कौशल यांच्या अंत्यविधीला मंदिरा जीन्स आणि टॉपमध्ये दिसल्याने  नेटकऱ्यांनी तिला खूपच ट्रोल केलं होतं. 

Read More