Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी तुला उद्ध्वस्त करणार,' ऋषिकेश मुखर्जी यांनी घेतली होती शपथ; मौसमी चॅटर्जींनी केला खुलासा 'तू माझा अहंकार....'

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांनी अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांची करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माफी मागितली होती. गुड्डी (Guddi) चित्रपट नाकारल्याने तू माझा अहंकार दुखावला होता असं त्यांनी सांगितलं होतं.   

'मी तुला उद्ध्वस्त करणार,' ऋषिकेश मुखर्जी यांनी घेतली होती शपथ; मौसमी चॅटर्जींनी केला खुलासा 'तू माझा अहंकार....'

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांनी माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता असा खुलासा अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांनी केला आहे. ऋषिकेश मुखर्जी यांनी स्वत: आपल्याकडे याची कबुली दिली होती असं मौसमी चॅटर्जी यांनी सांगितलं आहे. गुड्डी चित्रपट नाकारल्याने त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग होता असं त्यांनी सांगितलं आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आणि दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या करिअरमध्ये फक्त एकदाच एकत्र काम केलं. 1992 मध्ये आलेल्या टीव्ही शो तलाशमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी कौटुंबिक संबंध असतानाही दोघांनी फक्त एकाच प्रोजेक्टमध्ये काम का केलं? याचा खुलासा केला आहे. 

ह्रषिकेश मुखर्जी यांच्यासह फक्त 'तलाश'मध्ये काम करण्याबद्दल विचारलं असता मौसमी चॅटर्जी यांनी सांगितलं की, "ती ह्रषिकेश मुखर्जी यांची चूक होती. त्यांनी काय विचार केला किंवा कशाची दखल घेतली याची मला कल्पना नाही".

एकत्र काम न करण्याबद्दल विचारलं असता मौसमी चॅटर्जी यांनी एक घटना सांगितली जेव्हा त्यांनी फोन केल्यानंतर त्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या घरी पोहोचल्या होत्या. कौटुंबिक संबंध असल्याने त्या भेटण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान ऋषिकेश मुखर्जी यांनी सुरुवातीला माझे चित्रपट नाकारल्याने तुझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली. 

ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, "ऋषिकेश चालू शकत नव्हते. त्यांची त्यावेळी तशी स्थिती होती. त्यांनी मला फोन करुन सांगितलं की, इंदू मला माफ कर. मी तुझं करिअर उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलो होतो. तुला आठवतं का, तू एका चित्रपटाची कथा ऐकली होतीस आणि तो करण्यास तयारही झाली होतीस.. पण मी तुला त्या चित्रपटात घेण्यास नकार दिला आणि तुझ्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीचं नाव सुचवलं".

आपण अयशस्वी व्हावं असं ऋषिकेश मुखर्जी यांना का वाटत होतं? याबद्दलही मौसमी चॅटर्जी यांनी सांगितलं. "त्यांनी मला सांगितलं की, तू गुड्डी चित्रपट करण्यास नकार दिल्याने माझा अहंकार दुखावला होता". गुड्डी चित्रपट 1971 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

"मी तेव्हा कोलकाताची मुलगी होते. चित्रपटात मिनी फ्रॉक घालण्याची गरज होती. मी मात्र कोलकाताची असल्याने 13 व्या वर्षापासून साडी नेसण्याची संस्कृती आहे. माझ्या वडिलांनी मला चित्रपटात काम करु दिलं नाही. ते म्हणाले. ती दहावीत आहे आणि मुंबईला जाणार नाही. मी मिनी फ्रॉक घालण्यात फार सहज नव्हते. त्यावेळी मला ऋषिकेश मुखर्जी कोण हे कसं माहिती असणार?," असं मौसमी चॅटर्जी म्हणाल्या.

आपल्यातील संभाषणाचा पुढील भाग सांगताना त्या म्हणाल्या, "हे त्यांचे शब्द होते की, ही मुलगी मला नकार कसा काय देऊ शकते असा विचार करत मी द्वेष बाळगला होता. मी हिचं करिअर उद्ध्वस्त करणार असा विचार केला होता".

नंतर, हृषिकेश यांनी त्यांच्या चुकीबद्दल माफी मागितली आणि त्याच भेटीत तिला तलाशमध्ये भूमिकेची ऑफर दिली. "ते मला म्हणाले, मला चूक सुधारण्याची संधी दे. कृपया तलाश कर. ज्या नायिकेची मला शिफारस करण्यात आली आहे तिच्यात तुझ्यासारखी आध्यात्मिकता नाही," असं ते म्हणाले. 

Read More