Marathi News> मनोरंजन
Advertisement

Mulgi Zali Ho : 'हा' कलाकार घेणार किरण माने यांची जागा? साकारणार माऊच्या वडिलांची भूमिका

मुलगी झाली हो मालिकेत हा अभिनेता साकारणार विलास पाटील 

Mulgi Zali Ho : 'हा' कलाकार घेणार किरण माने यांची जागा? साकारणार माऊच्या वडिलांची भूमिका

मुंबई : स्टार प्रवाहावरील मालिका 'मुलगी झाली हो' मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. किरण माने प्रकरणाला एक वेगळच वळण मिळालं आहे.  किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. आता किरण माने यांची भूमिका कोण साकारणार? याबाबत नाव समोर आलं आहे. 

‘मुलगी झाली हो’ मालिकेत साजिरीच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. वेगवेगळ्या नावांचा विचार प्रेक्षक करत होते. पण आता 

अभिनेता आनंद अलकुंटे (actor Anand Alkunte) विलास पाटील म्हणजे साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. 

सध्या तरी याविषयी प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद अलकुंटे याआधी ‘रुद्रम’ मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. तसेच ‘बंदिशाळा’, ‘जोगवा’ चित्रपटात भूमिका साकारली आहे. तसंच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. (हे वागणं माणुसकीच्या विरोधातील.... किरण माने प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची मध्यस्थी) 

 

आता आनंद ‘मुलगी झली हो’ मालिकेत विलास पाटीलच्या भूमिका कशी पार पाडणार याकडे चाहत्यांच लक्ष लागून राहिलं आहे. आनंद अलकुंटे किरण माने यांची जागा घेऊ शकले का? असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले आहे.

दरम्यान ‘मुलगी झाली हो’ (‘Mulgi Jhali Ho’) ही मालिका आणि विलास पाटीलची (Vilas Patil) भूमिका साकारणाऱ्या किरण मानेंना अचानक एक दिवस मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

एकीकडे किरण यांनी दावा केला की, त्यांनी वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्या म्हणून त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

दुसरीकडे मालिकेतील महिला सहकलाकारांसोबत ते गैरवर्तवणुक करायचे आणि अपशब्द वापरायचे. यासाठी किरण यांना पूर्वसूचना देण्यात आली होती. पण तरीही त्यांच्यात बदल झाला नाही, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं, असे निर्माते म्हणाले होते. 

Read More