Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरूण गवळीच्या मुलीचा साधेपणात पार पडला विवाहसोहळा

अभिनेता अक्षय वाघमारेसोबत पार पडला विवाहसोहळा 

अरूण गवळीच्या मुलीचा साधेपणात पार पडला विवाहसोहळा

मुंबई : अरूण गवळी याच्या मुलीचं योगिताचं आज अतिशय साधेपद्धतीने अभिनेता अक्षय वाघमारेसोबत लग्न पार पडलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून दगडी चाळीत हे लग्न संपन्न झालं. लॉकडाऊनमुळे सगळीकडेच बंदी आहे. 

योगिता आणि अक्षयचा विवाहसोहळा हा अतिशय साधेपद्धतीने करण्यात आला. डिसेंबरमध्ये साखरपुडा झालेल्या या दोघांच लग्न २९ मार्च रोजी मुंबईतील लोअर परेल परिसरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार होतं. मात्र लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलण्यात आलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हळद  . #quarantinwedding #weddingvibes #

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

गुरूवारी संध्याकाळी या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम एकत्रच पार पडला. अभिनेता अक्षय वाघमारेची आई-वडिल या लग्नासाठी पुण्याहून मुंबईत आले. अतिशय साधेपद्धतीने हा सोहला पार पडला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मेहंदी  #weddingvibes #thank #you #punepolice #mumbaipolice #quartinewedding

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

अक्षय वाघमारे मराठी सिनेमात काम करत असून योगिता पेश्याने वकिल असून एक संस्था चालवते. काही वर्षांपासून योगिता आणि अक्षय एकमेकांना ओळखत असून अक्षय आणि महेश योगिताचा भाऊ हे दोघे खूप चांगल मित्र आहेत. 
अक्षय वाघमारेची आजी ही दादा कोंडकेंची बहिण. त्यामुळे थेट नसला तरीही अक्षयच्या कुटुंबाचा अभिनयाशी संबंध होता. अक्षय मुळचा फलटणचा. मॉडेलिंगकरता पुण्यात आल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी मॉडेलिंगच काम केलं. 

Read More