Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Munna Bhai MBBS' सिनेमात वेडसर भूमिकेत दिसला अर्शद वारसी, कारण...

'Munna Bhai MBBS' सिनेमात वेडसर भूमिका ऑफर झाली असूनही अर्शद वारसीने का साकारला 'सर्किट'?  

'Munna Bhai MBBS' सिनेमात वेडसर भूमिकेत दिसला अर्शद वारसी, कारण...

मुंबई : अभिनेता अर्शद वारसी कोणत्याही सिनेमात आपल्या अभिनयाचे चाहत्यांचे मन जिंकून घेतो. 'Munna Bhai MBBS'  सिनेमात देखील असंच काही झालं आहे. सिमेमात अर्शदला 'सर्किट' भूमिका ऑफर झाली. वेडसर भूमिका ऑफर झाली असली तरी, अर्शदने ती भूमिका तितक्याचं मेहनतीने आणि प्रामाणिकपणे साकारली. 'सर्किट' भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतलं. शिवाय सिनेमा अर्शदच्या करियरला कलाटणी देणारा देखील ठरला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे. अर्शद आता अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'बच्चन पांडे' सिनेमात दिसणार आहे. 

सर्किट भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला, 'स्क्रिप्टला कायम मी प्रेक्षकांच्या नजरेतून पाहातो आणि ती साकरण्यासाठी पूर्ण मेहनत करतो. 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमात सक्रिट ही भूमिका फक्त आणि फक्त संजय दत्तसाठी साकारली...'

अर्शद पुढे म्हणाला, ही भूमिका माझ्याआधी अभिनेता मकरंद देशपांडेला ऑफर झाली होती. पण त्यांनी भूमिका साकारण्यासाठी नकार दिला.' बच्चन पांडे सिनेमात देखील अर्शद प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडणार आहे. 

'बच्चन पांडे' सिनेमात सर्किट आणि अक्षय शिवाय अभिनेत्री कृती सेनन आणि जॅकलिन फर्नांडीस देखील दिसणार आहे. सिनेमा 18 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Read More