Marathi News> मनोरंजन
Advertisement

माझे पती हे माझे 'चीअरलीडर' - सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद आहूजा यांचे नाते फार कमालीचे आहे.

माझे पती हे माझे 'चीअरलीडर' - सोनम कपूर

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद आहूजा यांचे नाते फार कमालीचे आहे. सोनमच्या खाजगी आयुष्यात आनंद तिचा चिअरलीचर आहे. शनिवारी फिक्की (एफआयसीसीआय) लेडीज संस्थेच्या ३५व्या वार्षिक सत्रात उपस्थित होते. या सत्रादरम्यान सोनमने लैंगिक समानतेवर चर्चा केली. त्यानंतर लगेच पती आहूजा यांनी त्यांचे समर्थन केले. 

त्यावेळी सोनमने लैंगिक समानतेवर भाष्य केले, 'चित्रपट विश्वात नेहमी भेदभाव केला जातो, महिला आणि पुरूष असे मतभेत आहेत. पण महिलांनी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. कला समाजाचा प्रतिबिंब आहे. लग्ना नंतर माझे पतीच माझे चीअरलीडर आहे. माझ्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव आनंद सोनम आहूजा असे केले आहे.'

fallbacks

गतवर्षी सोनम आणि आनंद लग्न बंधणात अडकले. टेनिसपटू सानिया मिर्जा आणि सोनम या सत्रामध्ये उपस्थित होते. सोनम लवकरच 'द जोया फैक्टर' या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत  दलकेर सलमान भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा लेखिका अनुजा चौहान यांनी लिहली आहे.      

Read More