Marathi News> मनोरंजन
Advertisement

टीव्ही अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

कोणीतरी येणार येणार गं...    

टीव्ही अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  अनीता हसनंदानीच्या  (Anita Hassanandani)घरी लवकरच एक नवीन पहुणा दाखल होणार आहे. खुद्द अनीताने सोशल मीडियाच्या माध्यमातून गर्भवती असल्याची माहिती चाहत्यांना दिली. अनीता आणि  उद्योजक पती रोहित रेड्डीने त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांचा आनंद व्यक्त केला. 

या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचा आतापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. सर्वप्रथम लव्ह स्टोरी, साखरपुडा, लग्न त्यानंतर जीवनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 Love you @rohitreddygoa #gettingreadyforreddy

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on

अनीताने पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांकडून त्याचप्रमाणे नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या  आनंदात सामील झाले आहेत. अनीता आणि रोहितने गोव्यात १८ ऑक्टोबर २०१३ साली लग्न केलं. 

अनीताने ‘कभी सौतन कभी सहेली’या मालिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाला सुरूवात केली. त्यानंतर वरुश्मैलम वसंतम’ या तामीळ चित्रपटात तिने भूमिका बजावली. त्याचप्रामाणे 'ताल' चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

Read More