Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर नागा चैतन्यचा आघाडीच्या अभिनेत्रीशी साखरपुडा? वडील नागार्जुन यांनाही धक्का

त्यांच्या कानावर ही गोष्ट पडली होती.   

घटस्फोटानंतर नागा चैतन्यचा आघाडीच्या अभिनेत्रीशी साखरपुडा? वडील नागार्जुन यांनाही धक्का

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता नागा चैतन्य याचा आणि त्याची पत्नी समंथा अक्किनेनी यांनी वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय़ घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर या दोघांनीही याची जाहीर माहिती दिली. 

आता चर्चा सुरु झालीये ती म्हणजे नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या साखरपुड्याची. 

नागा चैतन्य आणि अनुष्काचा साखखरपुडा? बसला ना धक्का? असाच धक्का अभिनेते नागार्जुन यांनाही बसला होता. जेव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट पडली होती. 

एका मुलाखतीदरम्यान, नागार्जुन यांनी भूतकाळात घडलेल्या या प्रसंगावर वक्तव्य़ केलं होतं. 

नागा चैतन्य आणि अनुष्का शेट्टी यांच्या साखरपुड्याची चर्चा कानांवर पडली तेव्हा नागार्जुन स्वित्झर्लंडमध्ये होते. त्यांनी लगेचच आपल्या मुलाला फोन केला होता. 

'अरे तू काल साखरपुडा केलास, मला सांगितलंही नाहीस...', असं ते म्हणाले. वडिलांनी खिल्ली उडवताच नागार्जुननं 'हो का... खरंच... ' असं उत्तर देत तो खळखून हसला. 

फक्त नागार्जुनच नव्हे, तर खुद्द नागा चैतन्य आणि अनुष्काही त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा ऐकल्या तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता.

fallbacks

हे प्रकरण इतकं चर्चेत आलं होतं, की अनुष्कानं या साऱ्यासाठी एका निर्मात्यावर आरोप करत यामागे त्यांचाच हात होता असं म्हटलं होतं. 

Read More