Marathi News> मनोरंजन
Advertisement

PHOTOS : नागा चैतन्य- शोभिताच्या लग्नसमारंभांमध्ये समांथाची हजेरी; फोटोंवर खिळल्या नजरा

Naga Chaitanya Shobhita Dhulipala Wedding : दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत असून, ही धामधूम आहे अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या लग्नाची...   

PHOTOS : नागा चैतन्य- शोभिताच्या लग्नसमारंभांमध्ये समांथाची हजेरी; फोटोंवर खिळल्या नजरा

Naga Chaitanya Shobhita Dhulipala Wedding : सेलिब्रिटींचा विवाहसोहळा म्हटलं की चाहत्यांची उत्सुकता आणि त्यांचं कुतूहल शिगेला पोहोचलेलं असतं. सध्याही काहीसं असंच वातावरण पाहायला मिळत आहे, एका सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरूवात झाली असून, या समारंभांमधील कैक फोटो व्हायरल होत आहेत. 

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाला आता अवघे 2 दिवस शिल्लक असून, ही जोडी आता त्यांच्या नात्याची एक वेगळी आणि नवी सुरूवात करणार आहे. मंगल स्नानम आणि इतर विविध विधीपरंपरांच्या अनुषंगानं या कलाकारांच्या घरी लग्नविधी सुरू झाले आहेत. शोभिता आणि नागा चैतन्यचे अनेक फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत असतानाच इतरही काही फोटोंची आणि पाहुण्यांची विशेष चर्चा झाली. यातलंच एक नाव होतं समांथाचं. 

नागा चैतन्य- शोभिताच्या समारंभांना समांथाची हजेरी? 

शोभितापेक्षा समांथाचा लूक जरा जास्तच चर्चेत राहिला. बरं, इथं समांथा कोण? हा प्रश्न तुम्हाला पडत असेल, किंवा नागा चैतन्यची Ex Wife समांथा तुम्हाला आठवली असेल तर हा गैरसमज करून घेऊ नका. कारण, ही समंथा आहे ती म्हणजे शोभिताची बहीण. 

हेसुद्धा वाचा : 'बाहुबली 2' मधील अभिनेता वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात; फोटो तुफान व्हायरल

 

शोभिताची मोठी बहीण, समांथा हिनंही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बहिणीच्या मंगल स्नानम आणि तत्सम विधीदरम्यानचे फोटो शेअर करत हे खास क्षण सर्वांसमोर आणले. समांथा कलाविश्वात फार प्रसिद्ध नसली तरीही ती तिच्या क्षेत्रात उत्तम काम करत असल्याचं म्हटलं जातं. पेली राता विधीदरम्यानच समांथा कमाल लक्ष वेधताना दिसली. बहिणीच्या जीवनातील या अविस्मरणीय क्षणी ती तिची काळजीसुद्धा घेताना दिसली. नेटकऱ्यांनी या बहिणींच्या जोडीला कमाल प्रेम दिलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sobhita (@sobhitad)

शोभिता आणि नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. व्हायरल झालेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार दाक्षिणात्य पद्धती आणि परंपरांनुसार हा लग्नसोहळा पार पडेल. नागा चैतन्य आणि शोभिताच्या नात्याची चर्चा फार आधीपासूनच पाहायला मिळाली. यंदाच्याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अभिनेत्यानं पहिल्यांदाच शोभितासोबतचे फोटो शेअर करत नात्याची ग्वाही दिली. तेव्हापासून तो सातत्यानं तिच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसला. 

Read More