Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nagarjuna Birthday: सुपरस्टार नागार्जुन इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक,आकडा एकूण थक्क व्हालं

 नागार्जुनची संपत्ती माहितीय का? संपत्तीचा आकडा पाहून विश्वास बसणार नाही 

Nagarjuna Birthday: सुपरस्टार नागार्जुन इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक,आकडा एकूण थक्क व्हालं

मुंबई : साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna) आज, 29 ऑगस्ट रोजी त्यांचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. 

नागार्जुनने (Nagarjuna) आपल्या उत्कृष्ट अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साऊथमध्ये तो सुपरस्टार आहेच, मात्र बॉलिवूडमध्ये देखील त्याची क्रेझ आहे.आगामी ब्रम्हास्त्र (Brahmastra) या ब़ॉलिवूड सिनेमातही तो दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 
 
नागार्जुनचा (Nagarjuna) पहिला टॉलीवुड चित्रपट 1986 मध्ये रिलीज झाला आणि त्याच्या अभिनयाचे जगभर कौतुक झाले. केवळ भारतातच नाही, जगभरात नागार्जुनच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

संपत्ती किती?
मीडिया रिपोर्टनुसार, नागार्जुनने (Nagarjuna)  अंदाजे $123 दशलक्ष एवढी संपत्ती वाढवली आहे, जी अंदाजे 950 कोटी रुपयांमध्ये रूपांतरित होते, असे अहवालात म्हटले आहे. त्याच्या कमाईचा बहुतांश भाग चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंट मधून येतो. नागार्जुन चित्रपटासाठी फी घेण्याबरोबरच नफ्यातील काही वाटा देखील घेतो. तसेच ब्रँडच्या प्रमोशनमधून देखील तो मोठी कमाई करतो.  

आलिशान घर 
नागार्जुन (Nagarjuna)  हैदराबादच्या प्रमुख भागात राहतात. त्यांचे घर हैदराबादच्या फिल्म नगरमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या घराची किंमत सुमारे 42.3 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे देशात अनेक मालमत्ता आहेत.नागार्जुनचे वार्षिक उत्पन्न 48 कोटींहून अधिक आहे तर त्याचे मासिक टेकवे 4 कोटींहून अधिक आहेत. 

कारचा शौकिन 
नागार्जुन  (Nagarjuna) आलिशान कारचा शौकिन आहे.  त्याच्याकडे BMW-7 सिरिज आणि ऑडी A-7 आहे. त्याच्या प्रत्येक कारची किंमत 1 ते 2.5 कोटी दरम्यान आहे.

दरम्यान नागार्जुन (Nagarjuna)  बॉलिवूडमध्ये आगामी प्रदर्शित होणाऱ्या ब्रम्हास्त्र (Brahmastra) चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील आहेत. यासह अमिताभ बच्चन देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Read More