Nagarjuna Son Akhil got Married : दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनीनं त्याची गर्लफ्रेंड जैनब रावदजीशी लग्न केलं. आज शुक्रवारी 6 जून रोजी लग्नाच्या बंधनात अकडले आहेत. जैनब आणि अखिल गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 26 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचा साखरपुडा झाला. तर आता त्यांनी पारंपारिक हिंदू परंपरेनं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नातील कुटुंबातील लोकं आणि जवळचे मित्र-परिवार होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हैदराबादमध्ये झालेल्या या लग्न सोहळ्यात इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यात चिरंजीवी, राम चरण आणि प्रशांत नीलसारखे बडे कलाकार सहभागी आहेत. रिपोर्ट्सनुसार, अगदी साधारण पद्धतीनं अखिल आणि जैनब यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नात प्रायव्हसीला प्राधान्य दिलं होतं. वेडिंग लूकविषयी बोलायचं झालं तर अखिल आणि जैनब यांनी पारंपारिक तेलगू लग्नात जसे कपडे परिधान करतात तसे कपडे परिधान केले होते. जैनबनं आयवरी पेस्टर रंगाची साडी आणि सोन्याचे दागिणे परिधान केले होते. तर अखिलनं पांढऱ्या रंगाता कुर्तो आणि धोतर परिधान केलं होतं. त्याच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर त्यांच्या लग्नातील आणि त्या आधीच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
This morning, Akhil and Zainab tied the knot in the presence of close family and dear ones.
— Gulte (@GulteOfficial) June 6, 2025
Congratulations to the newly weds #AkhilZainab pic.twitter.com/IkEXoGIDMQ
जैनबविषयी बोलायचं झालं तर तिचे वडील जुल्फी रावदजी हे कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय आहेत. इतकंच नाही तर ते पायनीर असल्याचं म्हटलं जाकं. त्यांचे भाऊ जैन रावदजी, ZR रिन्यूएबर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते भारतातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात चर्चेत असलेलं नाव आहे.
हेही वाचा : कोटींमध्ये कमवतात तरी भाड्याच्या घरात राहतात बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी
जैनब ही एका बिझनेसमॅन कुटुंबातूल आली असली तरी देखील तिनं त्या क्षेत्रात न जाता तिच्या क्रिएटिव्हिटीला बाजूला महत्त्व दिलं आहे. जुनैब ही फक्त भारतात नाही तर दुबई आणि लंडनमध्ये देखील राहिली आहे. जैनब ही तिच्या पेन्टिंग्ससाठी ओळखली जाते. तिच्या कामाला हैदराबादमध्ये 'रिफ्लेक्शन' या एग्झीविशनमध्ये दाखवण्यात आले आहेत.