Marathi News> मनोरंजन
Advertisement

नागराज मंजुळे घेऊन येतोय नवा सिनेमा : टिझर आऊट

कोणता आहे हा सिनेमा 

नागराज मंजुळे घेऊन येतोय नवा सिनेमा : टिझर आऊट

मुंबई : नागराज मंजुळे हा अनेक चाहत्यांचा आवडता दिग्दर्शक आहे. त्याला कारण आहे त्याचा फँड्री आणि सैराट हे दोन यशस्वी सिनेमे. असं म्हटलं जातं की, जिथे नागराज तिथे राष्ट्रीय पुरस्कार. या दोन्ही सिनेमांकरता नागराज आणि टीमला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. आता नागराज सिनेमा लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करत आहे. नागराज बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक सिनेमा तयार करत असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती. 

नागराजने त्याच्या फेसबुक पेजवर एक टिझर शेअर केला आहे. हा टिझर नेमका कोणत्या सिनेमाचा आहे याची अद्याप माहिती हाती आलेली नाही. पण हा बॉलिवूड सिनेमाचा टीझर तर नाही ना अशी चर्चा आहे. या टिझर मधून फक्त आगामी प्रोजेक्ट लवकरच येणार असल्याच कळत आहे. 

नागराज मंजुळेच्या गाजलेल्या सैराट या सिनेमाचा बॉलिवूडमध्ये रिमेक झाला आहे. करण जोहरने या सिनेमाचा रिमेक 'धडक' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामधून जान्हवी कपूर आणि ईशान खत्तरने डेब्यू केलं आहे.  

Read More