Marathi News> मनोरंजन
Advertisement

...तर 'मै हूँ ना'मध्ये नाना खलनायक असते!

मराठी बरोबरचं हिंदी सिनेसृष्टीत नाना पाटेकर यांचा चांगलाच दरारा आहे.

...तर 'मै हूँ ना'मध्ये नाना खलनायक असते!

मुंबई : मराठी बरोबरचं हिंदी सिनेसृष्टीत नाना पाटेकर यांचा चांगलाच दरारा आहे.

अनेक दिग्दर्शकांना पाटेकर यांच्यासोबत एकदा तरी काम करण्याची इच्छा असते... पण त्यांचे व्यक्तिमत्व आणि कलाविश्वात असणारा वावर पाहून अनेक जणांना त्यांची भीती वाटते... असं आम्ही नाही तर दिग्दर्शक-अभिनेत्री फराह खान म्हणतेय... 

कोरिओग्राफर, दिग्दर्शक म्हणून नावारुपास आलेली फराह खान नाना पाटेकरांना इतकी घाबरली होती की इच्छा असूनही तिने आपल्या सिनेमात काम करण्यासाठी नानांकडे विचारणा केली नव्हती.

फराहला 'मैं हू ना' या सिनेमात खलनायकी भूमिकेसाठी नाना यांची निवड करायची होती. 

पण, त्यांच्या प्रती असणारी आदरयुक्त भीती पाहता तिने नानांसमोर या भूमिकेचा प्रस्ताव ठेवलाच नाही आणि यामुळेच तिने या भूमिकेसाठी सुनिल शेट्टीची निवड  केली. याचा खुलासा फराहनेचं एका कार्यक्रमादरम्यान केलाय.

Read More