Marathi News> मनोरंजन
Advertisement

नताशा-हार्दिक पांड्या पुन्हा एकत्र; घटस्फोटाच्या वृत्तांना ब्रेक

 नताशाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हार्दिकसोबतचे तिचे सगळे फोटो रिस्टोअर केले आहेत, ज्यात व्हॅलेंटाईन डे आणि तिच्या लग्नासारख्या खास क्षणांमधील फोटोंचा समावेश आहे.

नताशा-हार्दिक पांड्या पुन्हा एकत्र; घटस्फोटाच्या वृत्तांना ब्रेक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी त्यांच्या मौनाने अटकळांना आणखीच खतपाणी घातले आहे. या सगळ्यामध्ये नताशा इन्स्टाग्रामवर सतत अनेक अपडेट्स शेअर करत असते आणि लोकांना अनेक मिक्स हिंट्सही देत ​​असते. काल नताशाने घटस्फोटाचे संकेत दिले होते मात्र रात्री उशिरापर्यंत तिने असं काहीतरी केलं, ज्यामुळे हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. 

नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर हार्दिक पांड्यासोबत लग्न आणि व्हॅलेंटाईनसह अनेक फोटो रिस्टोअर केले आहेत. नताशाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हार्दिकसोबतचे तिचे सगळे फोटो रिस्टोअर केले आहेत, ज्यात व्हॅलेंटाईन डे आणि तिच्या लग्नासारख्या खास क्षणांमधील फोटोंचा समावेश आहे. नताशाच्या या स्टेपमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे,  दोघांचे एकत्र फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. मात्र अद्याप या दोघांचे फोटो गायब होण्यामागचं कारणसमजू शकलेलं नाही. जेव्हा घटस्फोटाच्या अफवांनी वेग घेतला तेव्हा नताशाने तिच्या इंस्टाग्रामवरून हार्दिकचं आडनाव 'पांड्या' काढून टाकलं आणि त्यांच्या लग्नाचे फोटो हटवले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याने  हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्यसोबत खेळतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावर नताशाने हार्ट इमोजीसह कमेंटही केली होती.हार्दिक पांड्याबद्दल बोलायचं झालं तर तो टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघासोबत पोहोचला नव्हता. तो लंडनमध्ये सुट्टी घालवत होता. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, त्यानंतर तो थेट न्यू यॉर्कमध्ये टीम इंडियामध्ये सामील होईल. नताशा आणि हार्दिक यांनी मे 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न केलं आणि या जोडीला तीन वर्षांचा मुलगा आहे ज्याचं नाव अगस्त्य पांड्या आहे.

Read More