Marathi News> मनोरंजन
Advertisement

Navjyot Singh Siddhu यांच्या मुलीचं भुरळ पाडणारं रुप

सिध्दूची मुलगी सोशल मीडियावर ऍक्टिव 

 Navjyot Singh Siddhu यांच्या मुलीचं भुरळ पाडणारं रुप

मुंबई : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय पाराही झपाट्याने वाढत आहे. यासोबतच काँग्रेसमधील अस्वस्थताही पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू गुरुवारी वडिलांच्या प्रचारासाठी बाहेर पडली. प्रचारादरम्यान राबिया सिद्धू यांनी बिक्रम मजिठिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच राबियाने सीएम चरणजीत सिंह चन्नी यांच्यावरही निशाणा साधला.

सोशल मीडियावर असते ऍक्टिव 

fallbacks

नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू भलेही सर्वसामान्यांमध्ये फारशी प्रसिद्ध नसेल, पण ती सोशल मीडियावर एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रीप्रमाणे ती तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

फॅशन डिझाइनर आहे राबिया 

fallbacks

राबिया सिद्धू एक व्यावसायिक फॅशन डिझायनर आहे. सिंगापूरच्या LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्समधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर तिने लंडनमधून फॅशन डिझायनिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

पटियालामध्ये घेतलं शिक्षण 

fallbacks

राबिया सिद्धूने तिचे शालेय शिक्षण पंजाबमधील पटियाला येथील यादविंद्र पब्लिक स्कूलमधून केले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या पाथवेज वर्ल्ड स्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले.

अभिनेत्रींना देते टक्कर 

fallbacks

राबिया सिद्धूच्या सोशल मीडियावरील फोटोंवरून दिसून येते की ती खूप फॅशनेबल आहे आणि तिला पार्टीजची खूप आवड आहे. यासोबतच तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकही मॉडेलपेक्षा कमी नाही आणि ग्लॅमरच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

 

वडिलांच्या विजयानंतरच करणार लग्न 

 

fallbacks

नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. वडिलांच्या निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या राबियाने सांगितले की, वडील जिंकल्याशिवाय ती लग्न करणार नाही.

 

राबियाचे मजिठियावर गंभीर आरोप 

fallbacks

निवडणूक प्रचारादरम्यान राबिया सिद्धू यांनी बिक्रम मजिठिया यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राबिया म्हणाल्या की, फार पूर्वी मजिठिया काका वडिलांकडे राजकारणाचे धडे गिरवायला यायचे. आज सत्य आणि असत्याची लढाई आहे, कुणाला साथ द्यायची हे जनतेने ठरवायचे आहे.

राबियाने मुख्यमंत्री चन्नी यांना देखील केलं टार्गेट 

fallbacks

राबिया सिद्धू यांनी प्रचारादरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावरही निशाणा साधला. राबिया म्हणाल्या की, सीएम चन्नी यांना गरीब म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यांच्या खात्यात १३३ कोटी रुपये आहेत. खरे तर, अलीकडेच राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून चन्नी यांच्या नावाची घोषणा करून त्यांना गरीब म्हटले होते.

 

Read More