Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाच वर्षांनी अखेर नवज्योत सिंग सिद्धू 'कपिल शर्मा शो' मध्ये परतणार, अर्चनाची खुर्ची धोक्यात?

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील अर्चना पूरण सिंग यांची खुर्ची धोक्यात? 5 वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचं होणार पुनरागमन!

पाच वर्षांनी अखेर नवज्योत सिंग सिद्धू 'कपिल शर्मा शो' मध्ये परतणार, अर्चनाची खुर्ची धोक्यात?

The Great Indian Kapil Show : कॉमेडियन कपिल शर्माचा द ग्रेट इंडियन कपिल शो सध्या त्याच्या सीझन 2 साठी खूप चर्चेत आहे. OTT प्लॅटफॉर्म Netflix वर कपिलचा हा शो प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. दरम्यान, कपिल शर्मा शो हा शोचे जुने जज नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे चर्चेत आला आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये द ग्रेट इंडियन कपिल शोच्या आगामी भागाबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांचे पुनरागमन झाल्याचं दिसत आहे. 

कपिलच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांचे पुनरागमन

कपिल शर्माचा कॉमेडी शो हा छोट्या पडद्यानंतर आता OTT प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांचा पसंतीस उतरला आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये भूल भुलैया 3 च्या संपूर्ण टीमने उपस्थिती दाखवली होती. त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केलं. अशातच आता या शोचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये कपिल शर्मा शोचे जुने जज नवज्योत सिंग सिद्धू न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांना पाहून कपिल शर्मा देखील हैराण झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे या खुर्चीच्या सध्याच्या मानकरी अर्चना पूरण सिंह कपिल शर्माला नवज्योत सिंग सिद्धू यांना खुर्ची सोडण्यास सांगताना दिसत आहेत. 

तसेच या व्हिडीओमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज हरभजन सिंग आणि त्याची पत्नी देखील दिसत आहेत. तसेच अभिनेत्री गीता बसरा दिसत आहे. या शोच्या मंचावर कपिल शर्माने धमाल मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की, नवज्योत सिंग सिद्धू यांचे पुनरागमन होत आहे. चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत. 

नवज्योत सिंग सिद्धू यांनी 5 वर्षांपूर्वी सोडला होता शो

2013 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे कपिल शर्माच्या शोचे एक भाग बनले होते. त्यानंतर त्यांनी 6 वर्षे या शोची खुर्ची सांभाळली. मात्र, 2019 मध्ये काही वादग्रस्त विधानांमुळे त्यांना हा शो सोडावा लागला. त्यानंतर या खुर्चीवर अर्चना पूरण सिंह या जजच्या भूमिकेत दिसल्या.

Read More